पंढरपूर, 26 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विठुरायाच्या पंढरपूर (pandharpur) नगरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार (rape) झाल्याचा धक्कादायक आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरमधील डोंबे गल्लीत राहणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले आहे. पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबासह या परिसरात राहते. आई धुणे भांड्याचे काम करते तर भाऊ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात.
Yucks! दंतमंजन घालून बनवली Toothpaste Coffee, VIDEO पाहून खवळले कॉफीप्रेमी
5 महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आरोपी विकास जाधव (वय 27 ) यांच्याशी संपर्कात आली होती. आरोपी विकास जाधव हा पीडितेशी फोनवर बोलत होता. पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर तिने मुलीला समजावून सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिला सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.
Explainer : या देशांना अर्ध्या किमतीत पेट्रोल-डिझेलची निर्यात करतो भारत; कारण...
मुलीवर सलग सात दिवस अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणी पीडिता आणि तिच्या आईने पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी विकास जाधवला अटक केली आहे.
संशयित आरोपी विकास जाधव याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर दुसरीकडे, भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनीही आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.