Home /News /maharashtra /

धक्कादायक, 16 वर्षांच्या मुलाला covaxin ऐवजी दिली covishield लस, येवल्यात घडला प्रकार

धक्कादायक, 16 वर्षांच्या मुलाला covaxin ऐवजी दिली covishield लस, येवल्यात घडला प्रकार


येवला तालुक्यातील  पाटोदा आरोग्य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा आरोग्य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा आरोग्य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे.

येवला, 03 जानेवारी : कोरोनावर मात करण्यासाठी आजपासून देशभरात 15 वर्षांपर्यंतच्या मुलाला कोरोनाची (Corona Vaccine) लस दिली जात आहे. या लहान मुलांना कोव्हॅक्सिनची (covaxin Vaccination) लस देण्याचे जाहीर झाले आहे. पण, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एका 16 वर्षीय मुलाला कोव्हॅक्सिन ऐवजी कोविडशिल्ड (covishield ) लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येवला तालुक्यातील  पाटोदा आरोग्य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे. आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले असून  शासनाने या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश दिले आहे.  मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात 16 वर्षीय विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी चक्क कोविशील्ड लस देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून येवला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत. (समीर वानखेडे वाढवणार राष्ट्रवादीची डोकेदुखी? NIA मध्ये बदली होण्याची शक्यता) या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी सदर मुलाच्या वडिलांनी केली आहे. तर आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सेविकेकडून चुकून हा प्रकार झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी सांगितले आहे. लहान मुलांचं Corona Vaccination, CoWIN वर अशी करा नोंदणी आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारीपासून कोविन (CoWIN) अॅप आणि पोर्टलवर या लसीकरणासाठी (Registration for vaccine) नोंदणी सुरु झालं. या लहान मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतंय. रविवारी 11 वाजेपर्यंत 8 लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. 1 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी(Children aged 15-18 can register on CoWIN from Jan 1 for Covid vaccination) करु शकता. कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली होती. अशी करा नोंदणी पहिलं Covin App वर जा. तुमचा मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा. नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा. तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा. सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल. या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जवळपास 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण दिलं आहे. तसंच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या