Home /News /maharashtra /

औरंगाबाद: अखेरचा ठरला प्रवास.. पायी घरी निघालेल्या 16 मजुरांना वाटेत मृत्यूनं असं गाठलं!

औरंगाबाद: अखेरचा ठरला प्रवास.. पायी घरी निघालेल्या 16 मजुरांना वाटेत मृत्यूनं असं गाठलं!

सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेक मजुरांनी पायी प्रवास करणं पसंत केलं पण, हा पायी प्रवास त्यांच्या जिवावर बेतला.

    औरंगाबाद, 8 मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. अनेक मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेक मजुरांनी पायी प्रवास करणं पसंत केलं पण, हा पायी प्रवास त्यांच्या जिवावर बेतला. जालना येथून मध्य प्रदेशात पायी निघालेल्या 16  मजुरांना औरंगाबादमधील करमाडजवळ रेल्वेनं चिरडलं. या घटनेत 16 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला असून 1 गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास जालन्याकडून येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना चिरडले. सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचं समजते. लॉकडाऊनमुळे हे मजूर मायदेशात परतत होते. करमाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेही वाचा.. धोकादायक इशारा! मे महिन्यात आणखी वाढू शकतो कोरोनाचा कहर मृत्यूनं असं गाठलं... सर्व मजूर जालन्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. मजुरांनी 45 किलोमीटरचा प्रवास करून करमाड येथे पोहोचले होते. तिथून ते भुसावळला जाऊन स्पेशल ट्रेनने मध्य प्रदेशात जाणार होते. पायी चालून थकलेले मजूर करमाड गावाजवळ रेल्वे रूळावरच थांबले. त्यांना झोप लागली आणि ती त्याच्यासाठी काळझोपच ठरली. मालगाडी येत असल्याचंही त्यांना समजलं नाही. जालन्याकडून आलेली मालगाडी या मजुरांना चिरडून निघून गेली. या अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना औरंगाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे. हेही वाचा.. लॉकडाऊनमध्ये तुमचीही चिडचिड होतेय का? मग हे उपाय करा चौकशीचे आदेश... दरम्यान, या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Aurangabad

    पुढील बातम्या