मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रस्त्याच्या बाजूला 16 गायी आढळल्या मृतावस्थेत, चंद्रपुरात खळबळ

रस्त्याच्या बाजूला 16 गायी आढळल्या मृतावस्थेत, चंद्रपुरात खळबळ

रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी ही जनावरे फेकली असावी असा स्थानिकांचा अंदाज आहे.

रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी ही जनावरे फेकली असावी असा स्थानिकांचा अंदाज आहे.

रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी ही जनावरे फेकली असावी असा स्थानिकांचा अंदाज आहे.

  • Published by:  sachin Salve

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 08 ऑगस्ट :  चंद्रपूर (chandrapur ) जिल्ह्यातील मुल तालुक्यात रस्त्याच्या बाजूला 16 गायी (Cows ) आणि बैल मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गायी मृताअवस्थेत परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूल तालुक्यातील विरई ते गडीसुर्ला मार्गावर ही घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला 16 गायी आणि बैल मृतावस्थेत आढळून आले आहे. मृत जनावरांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

IND vs ENG : 'भारताने मॅच हरली तरी चालेल, पण...' हे काय बोलला सेहवाग?

रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी ही जनावरे फेकली असावी असा स्थानिकांचा अंदाज आहे. ही मृत जनावरे कुठून आली आणि कोणी टाकली याबाबत अजूनही सुगावा मिळालेला नाही. मात्र, यामागे जनावरांच्या तस्करीचं कनेक्शन असल्याचा संशय आहे. मूल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

केवळ 4 रुपयांत करा 100 किमीचा प्रवास, जाणून घ्या या भन्नाट Electric Cycle बाबत

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीमध्ये तस्करीसाठी हैदराबादला जाणारे पशुधन जप्त करण्यात आले होते. ट्रकमध्ये कोंबून पशुधन भरल्याने 15 जनावरांचा गुदमरुन मृत्यू झाला. आसरल्ली इथ छत्तीसगडच्या वाटेन येणाऱ्या ट्रकची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर ट्रक थांबवून आसरल्ली पोलिसांनी कारवाई केली होती. ट्रकमध्ये पशुधन दाटीवाटीने भरल्याने 13 बैल आणि 2 गायींचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी चालक वाहकाला अटक केली होती.

First published:

Tags: Chandrapur