तिसऱ्या लाटेची भीती, वसईत 100 रग्णवाहिका रिक्षा उतरणार रस्त्यावर!

तिसऱ्या लाटेची भीती, वसईत 100 रग्णवाहिका रिक्षा उतरणार रस्त्यावर!

यासाठी 100 कोविड रिक्षा रुग्णवाहिका ह्या शहरात प्रभागनिहाय सर्वत्र उपलब्ध केल्या जाणार आहे.

  • Share this:

 नालासोपारा, 13 मे : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे, कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वसई विरार पालिकेनं (vasai virar municipal corporation) कंबर कसली आहे. लहान मुलांसाठी 150 बेड्सचे रुग्णालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसंच, 100 कोविड रुग्णवाहिका रिक्षाही (100 ambulance rickshaws) सज्ज करण्यात आल्या आहेत.

वसई विरार पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर कोरोनाची लाट थोपवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची भीती आहे. त्यामुळेच लहान मुलांसाठी आयसीयू,एनआयसीयू ऑक्सिजन बेड बनवण्यात येणार आहेत.

EPFO ने वाढवला डेथ इन्श्यूरन्स क्लेम, एकही पैसा न गुंतवता मिळेल एवढी रक्कम

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती त्वरित व वेळोवेळी उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेची वेबसाईट लवकरात लवकर सुरू करणे,  त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ योग्य त्या ठिकाणी योग्य उपचार मिळावेत याकरिता 9 प्रभाग समित्यांमध्ये प्रभाग समिती निहाय अति.आयुक्त व उप-आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या देखरेखीखाली 9 ‘कोरोना कंट्रोल वॉर रूम’ कार्यान्वित करून प्रत्येक प्रभागातील कोरोना रुग्णांना योग्य रुग्णालयात उपचार देणेसंबंधी तसेच त्या प्रभागातील कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची योग्य अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी महानगरपालिकेने मोठ्या रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना किंवा ज्या रुग्णांचे होम आयसोलेशन करणे शक्य नसेल अशा रुग्णांना रुग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी कोविड रिक्षा रुग्णवाहिकाची सुविधा शहरात करण्याच्या सूचना आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी Good News! वार्षिक 6000 च नाही तर मिळतील दरमहा 3000, वाचा सविस्तर

यासाठी 100 कोविड रिक्षा रुग्णवाहिका ह्या शहरात प्रभागनिहाय सर्वत्र उपलब्ध केल्या जाणार आहे. जेणेकरून रुग्णांना त्वरित ने-आण करणे शक्य होईल. तसंच सदर रिक्षा गल्लीबोळाच्या ठिकाणी, लहान रस्ते असणाऱ्या ठिकाणी सहजरीत्या उपलब्ध होवू शकतील. त्याचप्रमाणे नागरिकांना सुरळीतपणे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुविधा मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्त लोखंडे यांनी पालिका उपायुक्त डॉ.किशोर गवस ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेखा वाळके यांना  दिले आहे.

प्रत्येक प्रभागात किमान 10 लसीकरण केंद्र सुरू करण्याची महानगरपालिकेने नियोजन केले आहे. यापैकी 2 लसीकरण केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

Published by: sachin Salve
First published: May 13, 2021, 10:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या