मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 15 दिवसांसाठी मेगाब्लॉक, या कालावधीत राहील बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 15 दिवसांसाठी मेगाब्लॉक, या कालावधीत राहील बंद

सदर ढिले झालेले दगड काढतेवेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता व कामकाज सुरळीत पार पाडण्याकरीता नमूद ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी सव्वा चार या कालावधीत दिवसातून सहा वेळा प्रत्येकी 15 मिनिटांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 18 एप्रिल- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक्स्प्रेस वेवर 16 एप्रिल ते 5 मे 2019 या कालावधीत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून अमृतांजन ब्रिज येथे किमी नं. 45/710 ते 45/900, आडोशी येथे किमी 40/780 ते 40/995, खंडाळा येथे किमी 46/935 ते 47/910 आणि भातन बोगदा येथे 46/935 ते 47/910 येथे दोन्ही बाजूस दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रांमध्ये स्केलिंगचे काम किमी 15/241 ते किमी 70/079 वर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. पुणे विभागात 2 ठिकाणी ब्लॉक असणार आहे.

सदर ढिले झालेले दगड काढतेवेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता व कामकाज सुरळीत पार पाडण्याकरीता नमूद ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी सव्वा चार या कालावधीत दिवसातून सहा वेळा प्रत्येकी 15 मिनिटांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे...

1) ब्लॉक - 10.00 ते 10.15

2) ब्लॉक - 11.00 ते 11.15

3) ब्लॉक - 12.00 ते 12.15

4) ब्लॉक - 02.00 ते 02.15

5) ब्लॉक - 03.00 ते 03.15

6) ब्लॉक - 04.00 ते 04.15

भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

First published: April 18, 2019, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading