माता न तू वैरिणी! स्वराच्या हत्येला धक्कादायक वळण, जन्मदात्या आईनेच घेतला जीव

शहरात एका 14 महिन्यांच्या चिमुरडीच्या हत्येला धक्कादायक वळण लागलं आहे. ते म्हणजे, जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतला आहे. योगिता पवार असे निर्दयी आईचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 07:56 PM IST

माता न तू वैरिणी! स्वराच्या हत्येला धक्कादायक वळण, जन्मदात्या आईनेच घेतला जीव

प्रशांत बाग, (प्रतिनिधी)

नाशिक, 17 जुलै : नाशिक शहरात एका 14 महिन्यांच्या चिमुरडीच्या हत्येला धक्कादायक वळण प्राप्त झालं आहे. ते म्हणजे, जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. योगिता पवार असे निर्दयी आईचे नाव आहे. स्वराच्या रडण्याचा योगिता हिला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने स्वराचा गळा आवळला. मुलीची हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हातावर जखमा केल्या. अनोळखी व्यक्तीने घरात घुसून स्वराची हत्या केल्याचा बनावही तिने केला होता. उच्चभ्रू कुटुंबातील या घटनेने नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या निर्दयी आईला 'माता न तू वैरिणी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

(पाहा :VIDEO : रिक्षातून बाहेर खेचून पत्नीने पतीला भररस्त्यावर बेदम धुतले)

शहरातील औरंगाबाद महामार्गावरील पॅराडाईज अपार्टमेंटमधील मुकेश पवार यांची 14 महिन्यांची चिमुरडी स्वरा हिला अत्यंत जखमी अवस्थेत पंचवटीतील निमाणी परिसरातील येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर मृत घोषित केले होते. पोलिसांनी स्वराच्या मृत्युबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. घरी असलेली स्वराची आईसुद्धा जखमी असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. ही घटना घडली तेव्हा मुकेश पवार हे ड्युटीवर गेले होते.

(पाहा : मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल)

Loading...

अनोळखी व्यक्तीने घरात घुसून स्वराची हत्या केली तसेच माझ्यावरही वार केले असा, बनाव मारेकरी योगिताने केला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत योगिताने परस्परविरोधी माहिती दिल्याने तिच्यावरच अधिक संशय बळावला होता. तिच्या हातावरच्या जखमा देखील किरकोळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

(पाहा :VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप)

स्वराच्या सतत रडण्याला कंटाळून आईनेच घोटला गळा

अवघ्या 14 महिन्यांच्या स्वराच्या रडण्याचा जन्मदात्या योगिताला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने स्वराचा गळा घोटला. मुलीची हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हातावर जखमा केल्या. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी मारेकरी आईला अटक केली आहे. मानसिक अस्वस्थतेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

VIDEO : न विचारता बिस्किट खाल्ले म्हणून विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...