मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह 14 जणांची जामिनावर सुटका

अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह 14 जणांची जामिनावर सुटका

 अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर पोलिसांनी आज सकाळपासून अटकेची कारवाई सुरू केली होती.

अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर पोलिसांनी आज सकाळपासून अटकेची कारवाई सुरू केली होती.

अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर पोलिसांनी आज सकाळपासून अटकेची कारवाई सुरू केली होती.

    अमरावती, 15 नोव्हेंबर : अमरावतीमध्ये (Amravati violence case) रजा अकादमीच्या (raza akdami) मोर्चानंतर अमरावतीमध्ये भाजपने (bjp) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे (anil bonde) यांच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली होती. आज संध्याकाळी या 14 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर पोलिसांनी आज सकाळपासून अटकेची कारवाई सुरू केली होती. भाजप नेते माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, मनपा गटनेते तुषार भारतीय यांच्या सह 14 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज या सर्व नेत्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 हजार रु याच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.  बंद आणि हिंसाचार प्रकरणी शहरात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. जामिनावर सुटल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. एका समुदायाला खुश करण्याठी भाजप नेत्यांना अटक करण्यात आल्याची टीका भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली. सूर्यास्तानंतरही होणार पोस्टमॉर्टेम, मोदी सरकारने बदलला ब्रिटीशकालीन नियम तर, अमरावतीमध्ये जी जाळपोळ, दंगल झाली ती अनिल बोंडे यांनीच घडवली, त्यासाठी मुंबईतून पैसा आला आणि अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांना दारू पाजून दंगल घडवली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब यांनी केला होता. या आरोपानंतर अनिल बोंडे यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. 335 दिवस! T20 World Cup Final गमावल्यानंतर नीशमचं ट्वीट, काय आहे अर्थ? नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा अमरावतीच्या न्यायालयात दाखल करणार, असं आव्हानच बोंडे यांनी मलिक यांना दिले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या