नितीन बनसोडे, प्रतिनिधीलातूर, 19 एप्रिल : कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. राज्य, जिल्हे आणि गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाविक, मजूर अडकून पडले आहे. परंतु, आता लॉकडाउनमध्ये काही अटी शिथील करण्यात आल्या असून ज्या जिल्ह्यात जास्त प्रभाव नाही तिथून अडकलेल्या नागरिकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्वात मोठी प्रक्रिया लातूरमध्ये झाली आहे.
निलंगा तालुक्यातील राठोडा इथं महानुभाव पंथाचा चातुर्मास कार्यक्रमासाठी आलेले आणि लॉकडाउनमुळे 23 दिवसांपासून अडकून पडलेले तब्बल 1346 साधक आता आपापल्या घरी परतणार आहेत. मंत्रालयातून या सर्वांना सुखरूप घरी पाठण्याच्या सूचना देण्यात आल्या नंतर साधकांचा एक ग्रुप रवाना करण्यात आला आहे.
एक महिन्याच्या सत्संग सोहळ्यासाठी पुण्यातील जुन्नर येथील जाधववाडी येथून 27 फेब्रुवारी रोजी पंधराशे साधूसंत सत्संग सोहळ्यासाठी राठोडा गावात आले होते. तब्बल एक महिन्याचा म्हणजे 29 मार्चपर्यंत हा महानुभव पंथाचा सत्संग सोहळा चालला होता.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, हाच तो VIDEO
देशभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सरकारने याला अटकाव घालण्यासाठी 22 मार्चपासून लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सत्संगासाठी आलेल्या या साधूसंताना ही याचा फटका बसला. त्यामुळे ते राठोडा गावातच अडकून पडले होते. याबद्दलची माहिती प्रशासनाला होती. मात्र, यातून कुणीही बाहेर जाणार नाही, असा प्रशासनाने निर्णय घेतला आणि ते सर्व या ठिकाणी अडकून पडले. पंधराशेपैकी कांही भक्त विविध कामासाठी बाहेरगावी गेले होते. ते तिकडेच अडकले तर उर्वरित 1346 साधक हे राठोडा गावात अडकले होते. यात 824 महिला व 522 पुरुषांचा समावेश आहे. यात काही लहान मुलेही आहेत.
प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन, आम्ही आहोत त्याच ठिकाणी राहण्याचा निर्णय साधकांनी घेतला होता. परंतु, लॉकडाउनचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आल्यामुळे महिन्याभरापासून अडकून पडलेल्या साधकांनी आम्हाला लातूरमधून जाण्याची विनंती केली. 'लातूर जिल्ह्यात कुठे ही आमची सोय करू नका, आम्हाला जाण्याची परवानगी द्या, पुण्यातील जाधववाडी आश्रमात पक्के बांधकाम केलेलं आहे, आम्ही सर्व नियमांचे पालन करतोय आम्हाला तेथे जाऊ द्या', अशी मागणी महानुभाव पंथीयांकडून होत होती.
हेही वाचा - पुणेकरांनो हे आहेत तुमचा जीव वाचवणारे खरे रक्षक, हा VIDEO नक्की बघा
अखेर त्यास सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 800 साधकांना रवाना करण्यात आलं असून उर्वरित साधकांना 20 एप्रिल रोजी रवाना करण्यात येणार आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सोडण्याचीही पहिलीच घटना आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.