गोठ्यात खेळताना म्होरकीचा बसला गळफास, मुलाचा जागेवरच झाला मृत्यू

गोठ्यात खेळताना म्होरकीचा बसला गळफास, मुलाचा जागेवरच झाला मृत्यू

गोठ्यात खेळताना बैलाला बांधण्याच्या म्होरकीचा गळफास बसून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उदाचीवाडी येथे घडली. शुभम सत्यवान पवार (वय-13) असं मृत मुलाचे नाव आहे.

  • Share this:

बाळासाहेब काळे, (प्रतिनिधी)

पुरंदर, 23 मे- गोठ्यात खेळताना बैलाला बांधण्याच्या म्होरकीचा गळफास बसून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उदाचीवाडी येथे घडली. शुभम सत्यवान पवार (वय-13) असं मृत मुलाचे नाव आहे.

आई-वडील शेतात काम करी शुभम हा एकटाच गोठ्यात खेळत होता. शेताच्या असलेल्या पत्राशेडच्या गोठ्यात बैलासाठी म्होरकीशी खेळत असताना हाच खेळ त्याच्या जीवावर बेतला. गोठयात बैलाला बांधण्याच्या म्होरकीत त्याचा गळफास लागून त्याचा अंत झाला. या घटनेमुळे या कुटुंबासह संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे.

अंजिराच्या बागेत काम करीत होते. दुपारी कडक उन्ह असल्याने सर्वांनी काही काळ त्याच बागेतील सावलीत काही काळ विश्रांती घेतली. तर शुभमला झोप येत नसल्याने इतर मित्रांसमवेत तो जवळच असलेल्या पत्र्याच्या शेड वजा गोठ्यात खेळत होता. काही काळाने इतर मित्र निघून गेले. शुभम हा एकटाच खेळत होता.

दरम्यान, गोठ्यात बैलाला बांधण्यासाठी असलेल्या म्होरकी बरोबर तो एकटाच खेळत असताना त्यामध्ये त्याचे डोके अडकले, आणि त्याच्या मानेला गळफास बसला. दुपारी त्याचे घरातील व्यक्ती उठल्यानंतर त्याला जेवणासाठी हाक मारीत असताना तो कोठेच आढळून आला नाही. त्यामुळे त्या शेडमध्ये डोकावून पहिले असता तो त्या म्होरकीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने उतरून खाली घेतले. तसेच सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचारासाठी आणले असता त्यास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे सांगितले.

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 09:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading