पाणी भरण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय आदित्यचा पाय घसरला, शेततळ्यात बुडून मृत्यू

पाणी भरण्यासाठी  गेलेल्या 13 वर्षीय आदित्यचा पाय घसरला, शेततळ्यात बुडून मृत्यू

आदित्यला पाण्यात पडल्याचे पाहून तळ्याशेजारी गावकऱ्यांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

बीड, 27 नोव्हेंबर : शेततळ्यावर पाणी भरण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलांचा पाय घसरून तळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड (Beed) जिल्ह्यातील चोपनवाडी गावात घडली आहे. अल्पवयीन मुलाच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

आदित्य परमेश्वर माने असं मृत मुलाचे नाव आहे.  दुपारच्या सुमारास आदित्य तळ्यावर पाणी भरण्यासाठी  गेला होता. तळ्याच्या बाजूने चालत  असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो तळ्यात पडला.

सामान्यांना मोठा दिलासा! स्वस्त डाळ उपलब्ध व्हावी याकरता सरकार उचलणार मोठं पाऊल

आदित्यला पाण्यात पडल्याचे पाहून तळ्याशेजारी गावकऱ्यांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर आदित्यला बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. तळ्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला.डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

13 वर्षांच्या आदित्यच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  या घटनेने चोपनवाडी गाव शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मनोरुग्ण मुलाने केला बापाचा खून

दरम्यान, नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगर परिसरात पोटच्या मुलानं आपल्या वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना क्षुल्लक कारणावरून घडली आहे. मुलानं वडिलांवर धारदार शस्त्रानं सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घराबाहेरील रस्त्यावर फेकला.

136 जणांचे पथक पहाटेच धडकलं जळगावात, 'या' पतसंस्थेसह अवसायकांच्या घरी छापा

सम्राट रंगारी (वय-55) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आरोपी सिकंदर रंगारी (वय-19) याला पोलिसांनी अटक केली आहे. सिकंदरचं मानसिक संतुलन ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.    एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 27, 2020, 5:20 PM IST
Tags: बीड

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading