05 मार्च : बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतलाय. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.
बारावीची परीक्षा नुकतीच संपलीये. लवकरच पेपर तपासणीला सुरुवात होणार आहे मात्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता.
आज शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलक शिक्षकांसोबत चर्चा केली. या बैठकीत शिक्षकांच्या महत्त्वाच्या काही मागण्या मान्य़ झाल्या असल्याचं विनोद तावडे यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिक्षकांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. शिक्षकांच्या संपामुळे 96 लाख उत्तरपत्रिका तपासणीसाठी पडून आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.