1200 कोटी वाया, पुणे बीआरटी प्रकल्प गुंडाळणार? जबाबदार कोण? 

1200 कोटी वाया, पुणे बीआरटी प्रकल्प गुंडाळणार? जबाबदार कोण? 

पुणेकरांचा पीएमपी बस प्रवास अधिक जलद व्हावा, या उद्देशाने 3 डिसेंबर 2006साली मोठा गाजावाजा करून देशातला पहिला बीआरटी प्रकल्प पुण्यात सुरू झाला

  • Share this:

पुणे, 10 फेब्रुवारी : देशातला पहिला बीआरटी प्रकल्प ठरलेला पुणे बीआरटी प्रकल्प आता गुंडाळण्याचे स्पष्ट स्पष्ट संकेत पुणे मनपाकडून मिळत आहेत. सामान्य पुणेकर पीएमपी प्रवाशांनी मात्र बीआरटी प्रकल्प बंद करण्यास तीव्र विरोध केलाय. प्रकल्प बंदच करायचा होता तर मग त्यावर आजवर 1200 कोटी खर्च केलेच कशाला असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

BRT अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट्स...पुणेकरांचा पीएमपी बस प्रवास अधिक जलद व्हावा, या उद्देशाने 3 डिसेंबर 2006साली मोठा गाजावाजा करून देशातला पहिला बीआरटी प्रकल्प पुण्यात सुरू झाला खरा पण नियोजनाच्या अभावामुळे प्रारंभीपासूनच हा प्रकल्प कायमच वादात सापडत राहिला. आधी अपघातांच्या मालिकेनं बीआरटी बदनाम झाली आणि नंतर राजकीय पक्षांची अनास्था. या अशा एक ना अनेक कारणांमुळे बीआरटी अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय. कदाचित म्हणूनच पुण्याचे नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी या महात्वाकांक्षी प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.

बीआरटी प्रकल्प नेमका काय होता आणि आता त्याची कशी दयनीय अवस्था बनली?

 2006- साली तत्कालीन खासदार कलमाडींच्या पुढाकारातून पुण्यात बीआरटीचा अवतरली

2007- पुण्यात 1200 कोटी खर्चून 110 किमी बीआरटी उभारण्याच्या ठरावाला मंजुरीपण 14 वर्षात फक्त 35 किलोमीटर बीआरटीचेच काम पूर्ण

पुण्यात तब्बल 50हून अधिक बीआरटी बस स्थानकं उभारली. पण बेशिस्त वाहतुकीमुळे बीआरटी पूर्ण क्षमतेनं कधी धावलीच नाही

पुणे बीआरटी मार्गांची सध्याची अवस्था

- स्वारगेट-कात्रज, दुरूस्तीसाठी बंदहडपसर रोडवरील नगरसेवकानेच उखडून टाकली!

विश्रांतवाडी मार्गिका अंशतः सुरूमुंबई-पुणे रस्त्यावरील काम अजूनही अपूर्ण 

औंधरोड बीआरटीचे काम 90 टक्के पूर्ण, पण पोलिसांनीच परवानगी नाकारली

नाही म्हणायला नगर रोड आणि पिंपरी साईडची बीआरटी बऱ्यापैकी सुरू होती. पण तिथंही आता मेट्रो प्रकल्पांची बांधकामं सुरू झाल्याने तिथंही बीआरटीचा वेग पुन्हा मंदावलाय. बीआरटीमुळे खरंतर अनेकांचा प्रवास जलद होऊ लागला होता. म्हणूनच बीआरटी पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यात सुधारणा कराव्यात अशी अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केलीय.

पुण्यातील विविध बीआरटी मार्गांवरून खरंतर आजही रडतखडत का होईना पण तब्बल पाचशेंच्यावर पीएमपी बसेस धावत आहेत. बीआरटीवरून धावणाऱ्या बसेसचं दैनंदिन उत्पन्न देखील सामान्य बस पेक्षा एक हजार रूपयांनी अधिक आहे, किंबहुना पुणे बीआरटीनंतरची अहमदाबाद बीआरटी आजही सुसाट धावतेय. मग, पुण्यातच बीआरटीचा नेमका कशामुळे बोजवारा उडाला तर त्याचं उत्तर शिस्तप्रिय वाहतुकीत सापडतंय. म्हणूनच बीआरटीच्या या दयनीय अवस्थेला राजकीय अनास्थेसोबतच पुणेकरांची वाहतुकीचे नियम न पाळण्याची सवयही तितकीच कारणीभूत असल्याचं बोललं जातं. पाहुयात पुणे मनपाचे नवे आयुक्त अभ्यासाअंती बीआरटीला कायमचं इतिहासजमा करतात की नवसंजीवनी देतात ते.

Tags: pune
First Published: Feb 10, 2020 11:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading