सिंधुदुर्गमध्ये 12 वर्षांच्या कातकरी आदिवासी मुलीचं अपहरण आणि सुटका

सिंधुदुर्गमध्ये 12 वर्षांच्या कातकरी आदिवासी मुलीचं अपहरण आणि सुटका

सिंधुदुर्गातल्या फोंडाघाट गावात कातकरी आदिवासी वस्तीतल्या 12 वर्षाच्या मुलीला मारहाण करून अपहरण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय. अपहरण केलेली मुलगी थोड्याच वेळापूर्वी सापडली.

  • Share this:

15 एप्रिल : सिंधुदुर्गातल्या फोंडाघाट गावातील कातकरी जमातीतील अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती आयबीएन लोकमतला दिलीय. या घटनेनंतर तिच्या अपहरणकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

काल दुपारी आचरे गावचा माजी सरपंच भरवस्तीत घुसून या मुलीचं अपहरण केलं होतं. मात्र प्रत्यक्षात या मुलीच्या अपहरणाची तक्रार स्वीकारायला पोलिसांनी रात्रीचे 10 वाजवले होते. अखेर सामाजिक कार्यकर्त्याने हे प्रकरण लावून धरल्यानंतर पोलिसी तपासाला वेग आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सकाळी या मुलीला शोधून काढलं.

तिच्या अपहरणामागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.दरम्यान पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला एवढा उशीर का लावला याचीही शहानिशा करणार असल्याचं दिपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय.

First published: April 15, 2017, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading