वसई 09 जुलै : वसईमधील (Vasai) माणिकपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील समर्थ रामदास नगरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळी याठिकाणी एक आई आपल्या 12 वर्षीय मुलावर तो अभ्यास करत नसल्यानं ओरडली. यानंतर मुलानं रागात टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (12 Year Old Student Commits Suicide) केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
समर्थ रामदास नगर स्थित ईस्टव्हिव अपार्टमेंटमध्ये शुभम शिव प्रसाद (12) आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो पाचवीमध्ये शिकत होता आणि एकुलता एक मुलगा होता. सोमवारी संध्याकाळी आईनं त्याला अभ्यासावरुन ओरडलं असता त्याला या गोष्टीचा राग आला. काही वेळातच शुभमनं बेडरुममधील पंख्याला फाशी घेतली (Minor Commits Suicide). घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
VIDEO: वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात वाद:धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं
शुभमच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याआधीही वसईत लहान मुलांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. यात अनेकांनी क्षुल्लक कारणावरुन टोकाचं पाऊल उचललं आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्टि स्वप्निल भोपी म्हणाले, की मुलांच्या वागण्यात होणाऱ्या बदलांकडे आई-वडिलांनी लक्ष द्यायला हवं. त्यांच्या वागण्यात बराच काळ बदल जाणवला तर पालकांनी तात्काळ सतर्क होणं गरजेचं आहे.
मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा VIDEO कॉल
काय असतात कारणं ?
- अनेक कमी वयाची मुलं ही मानसिक समस्यांचा सामना करत असतात आणि ते स्वतःला यातून बाहेर काढू शकत नसतात.
- परीक्षेत नापास झाल्यास किंवा कौटुंबीक समस्यांमुळे त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येऊ शकतो.
- त्यांचं असं मत असतं, की आत्महत्या केल्यास काळजी कायमची संपेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suicide news, Vasai