• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • आजारी लेकीला झोळीत झोपवले अन् 30 किमी पायपीट करून बाबा दवाखान्यात पोहोचले, नव्या भारताचा असाही चेहरा!

आजारी लेकीला झोळीत झोपवले अन् 30 किमी पायपीट करून बाबा दवाखान्यात पोहोचले, नव्या भारताचा असाही चेहरा!

12 वर्षे मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिच्या वडिलाने उपचारासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या लाहेरी येथे तिला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

  • Share this:
गडचिरोली, 21 सप्टेंबर : प्रत्येक आई-वडिल आपल्या लेकराला सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. पण, शासकीय आणि प्रशासकीय अनास्थेपायी एका बापाला (father) आपल्या लेकराला हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी तब्बल 30 किमी पायपीट करावी लागली आहे. या पायी प्रवासादरम्यान खाटेवर झुला बनवून या 12 वर्षे मुलीला उपचारासाठी गडचिरोली येथे आणण्यात आले. गडचिरोली (gadchiroli) असो की बस्तर किंवा लगतचा तेलंगणाचा सीमावर्ती भाग, ओरिसाचा सीमावर्ती भाग  दंडकारण्यातल्या या घनदाट जंगलात असलेल्या अनेक गावांमध्ये अजूनही विकासाची किरणे पोहोचलेली नाहीत. आरोग्याच्या संदर्भात अजूनही अति दुर्गम भागातल्या जनतेला मोठे हाल सहन करावे लागतात.गडचिरोली जिल्ह्याला लागून छत्तीसगडच्या नारायणपूर (Narayanpur, Chhattisgarh) जिल्हा आहे. नारायणपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेल्या मेटेवाडा हे अतिदुर्गम गाव असून तेथील मुरी पांडू पुंगाटी या 12 वर्षे मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिच्या वडिलाने उपचारासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या लाहेरी येथे तिला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणखी एक क्रिकेटपटू देश सोडणार, वर्ल्ड कपसाठी या देशाकडून खेळणार! छत्तीसगडच्या सीमावर्ती गावातून लाहेरी पर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. या ठिकाणी या मार्गावर साधा रस्ता नसल्याने डोंगरदऱ्यात जंगल नाले पार करून लाहेरी येथे जाणे आवश्यक होते. रुग्णवाहिका येऊ शकत नसल्याने अखेर त्या वडिलांनी मुलीसाठी एका लाकडावर झुला तयार केला. त्यात तिला झोपवून वडील आणि दुसरा तरुण अशा दोघांच्या खांद्यावर तो झुला  करून त्या मुलीला त्यात झोपवून 30 किलोमीटर पायी प्रवास करून लाहेरपर्यंत आणण्यात आले. आता रेशन दुकानातही काढता येणार पासपोर्ट आणि पॅन कार्ड, इतरही अनेक सुविधा छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागातली मेटेवाडासह अशी अनेक गावे आहेत. जिथं उपचारासाठी आरोग्य केंद्र नाही किंवा तिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, तेथील लोकांना उपचारासाठी महाराष्ट्रातल्या भामरागड तालुक्याची वाट धरावी लागते. त्यामुळे या परिसरात रुग्णवाहिका आणि आरोग्य सेवा पुरावावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Published by:sachin Salve
First published: