...आणि गौरवने बिबट्याच्या लगावली कानशिलात, सिन्नरमधील थरारक घटना

...आणि गौरवने बिबट्याच्या लगावली कानशिलात, सिन्नरमधील थरारक घटना

गौरव हा मक्याच्या शेतात गेला होता. त्यावेळी तिथेच दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावर झेप घेतली.

  • Share this:

सिन्नर, 04 नोव्हेंबर : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinner) तालुक्यात मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने (leopard) 12 वर्षांच्या गौरव काळुंगे (Gaurav Kalunge) याच्यावर हल्ला केला होता. पण, त्याने मोठ्या हिंमतीने बिबट्याच्या कानशिलात लगावून आपला जीव वाचवला.

दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यात सोनारी गावात  ही घटना घडली होती. या घटनेत गौरव काळुंगेच्या हाताला 5 टाके पडले आहेत. त्याच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

इंग्लंडच्या दरबारात ज्यांचे झाले कौतुक, ते हात आता फोडत आहेत दगड!

गौरव हा मक्याच्या शेतात गेला होता. त्यावेळी तिथेच दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावर झेप घेतली. बिबट्याने जशी झेप घेतली गौरवने आपला एक हात पुढे करून वाचण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा उजवा हातच बिबट्याने आपल्या जबड्यात पकडला. आता बिबट्याने आपला हात तोंडात पकडलेला पाहून गौरव क्षणभर घाबरला, पण दुसऱ्याच क्षणी त्याने हिंमत दाखवून डाव्या हाताने बिबट्याच्या कानशिलात लगावली.

पूर्ण ताकदीने त्याने बिबट्याच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे बिबट्याने त्याचा हात सोडला आणि त्यानंतर भांबवलेल्या अवस्थेत बिबट्याने शेतातून धूम ठोकली. अंगावर शहारे आणणारा हा अनुभव गौरवने जेव्हा गावातील लोकांना सांगितली, तेव्हा सर्वांनी काळजी तर व्यक्त केली पण त्याच्या धाडसाचे कौतुकही केले.

पाथर्डीत बिबट्याची दहशत, 3 चिमुरड्यांचा बळी

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत झाली आहे. मागच्या 10 दिवसात तालुक्यात बिबट्याने तीन बाळांचा बळी घेतला. यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याची भितीमुळे तालुक्यामधील लोकं शेतात, कामासाठी जायला घाबरत आहे.

आनंद महिंद्रांनी US election बद्दल ट्विटरवर घेतला पोल; यूजर्सचे भन्नाट रिप्लाय

मागील आठवड्यात कारडवाडी शिवरात राहणारे संजय बुधवंत यांच्या चार वर्षाच्या सार्थकला बिबट्याने घराच्या अंगणातून उचलून नेले होते. त्यानंतर आजूबाजूच्या गावांमधील शेकडो तरुणांनी लाठ्या काट्या सह तब्बल पाच किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. पण, सार्थकाचा काही शोध लागला नाही. सार्थकच्या छिन्नविछिन्न देह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळला होता.

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झालेल्या तीन चिमुकल्याच्या कुटुंबाला सरकारने पंधरा लाखाची मदत जाहीर केली आहे. तसंच वनमंत्री संजय राठोड यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सिन्नर, जुन्नर,संगमनेर,धुळे, नंदुरबार,

...मोडला नाही कणा! घर चालवण्यासाठी 120 किमीचा सायकल प्रवास करून विकतोय मिठाई

नाशिक,जळगाव,औरंगाबाद, बीड येथील पथके आणि जिल्ह्यातून वनविभागाचे कर्मचारी अधिकारी आणि वन्य प्राणी अभ्यासक यांच्यासह नगर जिल्ह्यातील वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी सर्व साधन सामग्रीसह बिबट्याचा माग काढून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसून येत आहेत.

Published by: sachin Salve
First published: November 4, 2020, 4:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या