पंढरपुरला निघालेल्या सायकल वारीला गालबोट, मुलाला ट्रकने चिरडले

पंढरपुरला निघालेल्या सायकल वारीला गालबोट, मुलाला ट्रकने चिरडले

पंढरपूर येथे निघालेल्या सायकल वारीला शु्क्रवारी गालबोट लागले. सिन्नर बायपासवर 12 वर्षीय सायकल पटूला ट्रकने चिरडले.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)

नाशिक, 28 जून- येथून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघालेल्या सायकल वारीला शु्क्रवारी गालबोट लागले. सिन्नर बायपासवर 12 वर्षीय सायकल पटूला ट्रकने चिरडले. सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली. प्रेम नाकोडे या सायकल पटूचा जागीच मृत्यू झाला. यंदाच्या सायकल वारीत प्रेम नाकोडे हा सहभागी झाला होता. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रेमचे आई-वडील या घटनास्थळी पोहोचले आहेत. गोल्फ क्लब येथून निघालेल्या राहिला सिन्नर सायकलिस्ट असोसिएशन यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. याच ठिकाणी प्रेमला भरधाव ट्रकने चिरडले.

दरम्यान, नाशिकमधून सायकल वारीचे सकाळी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाले. नाशकात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सायकल वारीला ग्रीन सिग्नल दाखवला.जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वत: वारीत सहभाग घेतला. सातशेहुन अधिक सायकलिस्ट यात सहभागी झाले आहेत. सायकल वारीचे आठवे वर्ष आहे. वारीत 6 वर्षांच्या चिमुरडीपासून ते 65 वर्षांच्या आजोबांचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे 6 दिव्यांग देखील सायकल वारीत सहभागी झाले आहेत.

सामाजिक संदेश देणारी हायटेक वारी..

नाशिक सायकलिस्टच्या संकल्पनेतून यंदाही आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या नाशिक ते पंढरपूर या हायटेक सायकल वारीद्वारे कर्करोग आणि बाल लैंगिक अत्याचाराविरोधात सामाजिक संदेश दिला जात आहे.

वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुण्यात फातीमानगरला क्रोम मॉल चौकात भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पालखी बंदोबस्त लावण्यासाठी निघालेल्या लष्कर पोलीस स्टेशनचे डिओ मिलींद मकासरे यांच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शु्क्रवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली.

VIDEO: मुसळधार पावसानं प्लॅटफॉर्मवरच आला धबधबा

Tags:
First Published: Jun 28, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading