Home /News /maharashtra /

सचिन आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात, भाजपच्या आयटी सेलची होणार चौकशी

सचिन आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात, भाजपच्या आयटी सेलची होणार चौकशी

'भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास केला'

    नागपूर, 15 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाबद्दल (Farmer Protest) आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने (rihana) ट्वीट केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ट्वीट केले होते. त्यांच्या ट्वीटबद्दल भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे, एकूण 12 जणांची ओळख झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोनातून बरे झाले असून  आज त्यांना सुट्टी मिळाली. नागपूरच्या एक खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर 5 फेब्रुवारी पासून उपचार सुरू होता. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सेलिब्रिटींच्या चौकशी प्रकरणावरून खुलासा केला आहे. 'सेलिब्रिटींच्या ट्वीट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास केला गेला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे. 12 लोकांची ओळख झाली आहे, त्यांची चौकशी होणार आहे', अशी महत्त्वाची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. 'भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास केला', असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड प्रकरणात कुणावरही दबाव नाही, मुळात दबावाचा प्रश्न येत नाही. नियमानुसार, चौकशी होईल. या प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील त्यानुसार कारवाई केली जाईल. पण विरोधीपक्ष जे आरोप करता यात काही तथ्य नाही, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबद्दल तक्रार केली होती.  आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्वीट केले होते. यातील शब्द सुद्धा अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी  एक सारखे टीव्ट केले का या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकसारखेच होते. त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. गुप्तचर विभागाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सेलिब्रिटींवर कुणी दबाव आणत असेल तर ते गंभीर आहे, असंही सचिन सावंत यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांनीही  'भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे,' असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sachin tendulakar, Tweet, Twitter

    पुढील बातम्या