04 जुलै : टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून खळाळत वाहणारा विठ्ठलभक्तीचा प्रवाह चंद्रभागारूपी महासागरात विलीन झाला. आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह सुमारे 12 लाख वैष्णवांचा मेळा वैकुंठभूमी पंढरी नगरीत न्हाऊन निघतोय. संतांसह वैष्णव मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात चंद्रभागी एकरुप झाले आहेत.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 12 लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज आहे, पंढरीतले सर्व रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेलेत. दर्शनाची रांग पाच किमीपेक्षा जास्त लांब गेलीय आणि दर्शनाला २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतोय. मात्र यावेळी वारकऱ्यांची संख्या तीस ते चाळीस टक्के कमी असल्याचा अंदाज आहे.