परभणी, 16 मार्च: मागील काही काळापासून राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारात चांगलीच वाढ झाली आहे. राज्याच्या विविध कोपऱ्यातून दररोज महिला अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत आहेत. असं असताना परभणीत (Parbhani) एक अमानवी घटना घडली आहे. येथील एका विकृतानं रुग्णालयात नेण्याच्या बहाण्यानं एका 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार (rape on minor boy) केले आहेत. पीडित मुलानं आपल्या आई वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडित मुलाच्या आई वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. रविवारी (13 मार्च) दुपारी कोतवाली पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत. सय्यद अन्सार सय्यद सईद असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.
हेही वाचा-विवाहितेच्या आत्महत्येनंतर BF चा खून; जिथे अंत्यसंस्कार केले तिथेच आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 11 वर्षीय पीडित मुलगा परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात खेळत होता. याठिकाणी खेळत असताना एक दगड लागून त्याचं डोकं फुटलं होतं. यावेळी नराधम आरोपी सय्यद अन्सार सय्यद सईद पीडित मुलाला बळजबरी करत रुग्णालयात नेतो म्हणून घेऊन गेला. पण रुग्णालयात जाण्याऐवजी तो पीडित मुलाला याच भागातील एका हॉलच्या पाठीमागे घेऊन गेला. याठिकाणी नराधमाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला.
हेही वाचा-दारूच्या नशेत मित्राला हिनवलं अन्..; नागपुरात दिवसाढवळ्या घडला हत्येचा थरार
पीडित मुलाने घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी थेट कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी सय्यद अन्सार सय्यद सईद याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका अकरा वर्षीय मुलावर अशाप्रकारे लैंगिक अत्याचार केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.