मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, 11 तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे, एकाच दिवसात 25 जणांचे 'नाराजी'रामे

बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, 11 तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे, एकाच दिवसात 25 जणांचे 'नाराजी'रामे

एकाच दिवसात 25 जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

एकाच दिवसात 25 जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

एकाच दिवसात 25 जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

बीड, 10 जुलै : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (beed mp pritam munde) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप (bjp workers) कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरूच आहे. एकाच दिवसात 25 जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरूच जिल्ह्यातील  11 तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले आहे.  भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द सर्व तालुकाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले आहे.

अमेरिकेची झोप उडाली; चिनी सैनिकांना शक्तिशाली करण्यासाठी जेनेटिक फेरफार

त्याआधी शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

विकी कौशलनं असं दिलं होतं आपलं पहिलं ऑडिशन; 9 वर्ष जुना PHOTO व्हायरल

दरम्यान, प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.

या तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे

1) ऍड सुधीर घुमरे पाटोदा-तालुका अध्यक्ष

2) अरुण राऊत तालुका अध्यक्ष माजलगाव

3) भगवान केदार तालुका अध्यक्ष केज

4)सतीश मुंडे परळी

5)बाळासाहेब तोंडे धारूर

6) पोपट शेंडगे वडवणी

7)अच्युत राव गंनगे अंबेजोगाई

8)डॉ मदुसूदन खेडकर-शिरुर

9)डॉ वासुदेव नेहरकर-वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष

10)डॉ लक्ष्मण जाधव भटके-विमुक्त आघाडी

11) धनंजय घोळवे- दिव्यांग आघाडी

12)संग्राम बांगर-  विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष

13)बबन सोळंके -जिल्हा सचिव भाजप

14)प्रदीप नागरगोजे-विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष

First published:

Tags: Beed news, Pankaja munde