मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खूशखबर! राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; सरकारकडून महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ

खूशखबर! राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; सरकारकडून महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने महागाई भत्त्यात दोन आकडी वाढ केली आहे.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने महागाई भत्त्यात दोन आकडी वाढ केली आहे.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने महागाई भत्त्यात दोन आकडी वाढ केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 ऑक्टोबर: ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारी आणि निमसरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवण्यात (11 percent inflation allowance increased) आला आहे. राज्यातील तब्बल 19 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेल्या वर्षभरापासून गोठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ केली आहे. यामुळे 1 जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्क्यांऐवजी 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात खूशखबर देत, राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.  ऑक्टोबरपासून हा वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबतही राज्य सरकार सकारात्मक असून यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

हेही वाचा-Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! BoB ने घटवले गृहकर्जावरील व्याजदर

दरम्यानच्या पाच महिन्यातील 10 टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबतही सरकारनं लवकर निर्णय घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा-महागाईचा फटका! Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST

कोरोना प्रादुर्भावाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम झाला होता. त्यामुळे विविध योजना आणि सरकारी वेतनवाढ यामध्ये कपात करण्यात आली होती. याचा फटका राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना बसला होता. पण आता राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येताना दिसत आहे.

First published:

Tags: महाराष्ट्र