Home /News /maharashtra /

बापरे! पानटपऱ्या बंद असताना महाराष्ट्रात समुद्रामार्गे आल्या 71 लाख सिगारेट, किंमत वाचून व्हाल अवाक्

बापरे! पानटपऱ्या बंद असताना महाराष्ट्रात समुद्रामार्गे आल्या 71 लाख सिगारेट, किंमत वाचून व्हाल अवाक्

राज्यात तंबाखू आणि सिगारेटची विक्री करण्यास परवानगी नसली तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे.

    मुंबई, 12 जून : राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र अद्यापही राज्यातील पान टपऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे राज्यात तंबाखू आणि सिगारेटची विक्री करण्यास परवानगी नसली तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे. त्यातच राज्यात मोठ्या किमतीच्या सिगारेट आल्याची बातमी समोर आली आहे. Maharashtra: Directorate of Revenue Intelligence ने दुबईहून आलेला मोठा सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या कंटेनरमध्ये कोटी रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली आहे. हा अवैध साठा समुद्रेमार्ग राज्यात पोहोचला आहे. जवाहरलाल नेहरू बंदरातून हा साठा जप्त केला आहे. या मोठ मोठ्या कंटेनरमध्ये 71 लाख 6 हजार 600 परदेशी ब्रँड्सच्या सिगारेट असून याची किंमत तब्बल 11 कोटी 88 लाख 28 हजार 800 इतका आहे. राज्यात सिगारेट बंद असताना इतक्या मोठ्या संख्येने अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. हे वाचा -मोठी बातमी : या तारखेपासून होणार शाळा सुरू, असा आहे प्लॅन दुर्लक्ष करू नका! ही 2 लक्षणं आढळल्यास करावी लागू शकते कोरोना टेस्ट
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Tobacco

    पुढील बातम्या