गणिताचा पेपर कठीण गेल्याने जळगावात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

गणिताचा पेपर कठीण गेल्याने जळगावात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

गायत्री ही शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती दहावीची परीक्षा देत होती. गायत्रीचा गुरुवारी गणिताचा पेपर होता.

  • Share this:

जळगाव,13 मार्च:दहावीच्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरसोली येथे ही घटना घडली आहे. गायत्री तुकाराम अस्वार (वय-16, रा. इंदिरानगर, शिरसोली) असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून तिला पेपर कठीण गेल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गायत्री ही शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती दहावीची परीक्षा देत होती. गायत्रीचा गुरुवारी गणिताचा पेपर होता. मात्र तिला गणिताचा पेपर कठीण गेला होता. त्यामुळे ती टेन्शनमध्ये होती. ती घरी आली तेव्हा तिचे आई-वडील शेतात गेले होते. नैराश्येत गायत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीने परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा..विवाहितेचं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा

पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. गायत्रीचा मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गायत्रीच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, आई-वडील असा परिवार आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांना दिली आत्महत्या न करण्याची शपथ

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची दहावी परीक्षा 3 मार्चपासून सुरु झाली आहे. दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वाशिममधील एका शाळेने विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ देण्यात आली. वाशिमच्या नालंदानगर भागातील गौरी शंकर विद्यालयात दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली. कार्यक्रमात आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली. शालेय जीवनात कठीण प्रसंगी मी कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आत्महत्या करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शपथ भावी संघर्षमय जीवनात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला जातो. तसंच घरातील सगळ्या सदस्यांनाही आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु, असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा.....तर घरात बोभाटा करीन; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं 15 वर्षीय दीराला केलं मजबूर

गौरी शंकर विद्यालयाच्या संचालिका शांताबाई शिंदे यांनी सांगितलं की, पाचवी ते दहावीपर्यंतच्या गौरी शंकर विद्यालय शालेय शिक्षणाबरोबर दैनंदिन आयुष्यातील कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. आतापर्यंत या चार शाळांमधीलत एकाही विद्यार्थ्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं नसल्याचं सकारात्मक चित्र आहे.

First published: March 13, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading