मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आश्रमशाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीनं संपवलं जीवन; पालघरमधील खळबळजनक घटना

आश्रमशाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीनं संपवलं जीवन; पालघरमधील खळबळजनक घटना

Suicide in Palghar: पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील विनवळ येथील एका आश्रमशाळेत (Ashram School) शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या (10th Grade minor girl commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पालघर, 23 नोव्हेंबर: पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार (Jawhar) तालुक्यातील विनवळ येथील एका आश्रमशाळेत (Ashram School) शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या (10th Grade minor girl commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  संबंधित मुलीनं सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. तिने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. जव्हार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मोनिका धाकलू मोरघा असं आत्महत्या करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहे. ती जव्हार तालुक्यातील विनवळ ढाकपाड येथील रहिवासी होती. सोमवारी घरी कोणी नसताना 10 वीच्या विद्यार्थिनी मृत्यूला कवटाळलं आहे. मोनिकाच्या आत्महत्येची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून मंगळवारी सकाळी जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात तिचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा-औरंगाबादेत युवक युवतीचा भयावह शेवट; एकाच झाडाला गळफास घेत संपवलं जीवन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मोनिका ही अनिवासी विद्यार्थिनी होती. तसेच ती नियमितपणे शाळेत जात होती. 20 नोव्हेंबर रोजी शनिवारी देखील ती नियमितपणे शाळेत गेली होती. पण रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी राहिल्यानंतर, सोमवारी ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली नाही. दरम्यान घरी कोणी नसताना, सायंकाळी 4 च्या सुमारास 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

या घटनेची माहिती मिळताच जव्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. ही घटना घडल्यानंतर, सायंकाळी सातच्या सुमारास मोनिकाच्या आत्महत्येची माहिती आश्रमशाळेत देण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Palghar, Suicide