मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Yavatmal: मदतीसाठी फोडला टाहो, शेवटी सोडला जीव; विहिरीतील गाळात अडकल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू

Yavatmal: मदतीसाठी फोडला टाहो, शेवटी सोडला जीव; विहिरीतील गाळात अडकल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू

Death in Yavatmal: शेतातील विहिरीत आंघोळीसाठी उतरलेल्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा (10th class student) विहिरीतील (Well) गाळात फसल्यानं दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

यवतमाळ, 03 जुलै: आसपास कुणीही नसताना शेतातील विहिरीत आंघोळीसाठी उतरलेल्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा (10th class student) विहिरीतील (Well) गाळात फसल्यानं दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. रात्र होऊनही मुलगा कसा घरी आला नाही, यामुळे कुटुंबीयांनी बेपत्ता तरुणाची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. यानंतर रात्री उशीरा कुटुंबीयांना शेतातील विहिरीजवळ तरुणाचे कपडे आणि सायकल आढळली. पण अंधार खूप असल्यानं कुणीही विहिरीत उतरलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणाचा मृत्यदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

सुदर्शन संजय गेलेवार असं 16 वर्षीय मृत मुलाचं नाव होतं. गुरुवारी दुपारी मृत सुदर्शन आपल्या शेतात गेला होता. दरम्यान उन्हाचा पारा वाढल्यानं तो आंघोळीसाठी विहिरीत उतरला. पण विहिरीत उतरताच तो गाळात अडकू लागला. दलदलीचा अंदाज न आल्यानं तो आणखी अडकत गेला. यावेळी शेतात आसपासच्या परिसरात कोणीच नसल्यानं त्याचा मदतीचा टाहो कोणालाही ऐकू आला नाही. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, रात्र होऊनही मुलगा घरी न परतल्यानं कुटुंबीयांची चिंता वाढत होती. रात्री उशीरापर्यंत कुटुंबीय त्याला सर्वत्र शोधत होते. पण त्याचा काही थांगपत्ता नाही लागला. जवळचे नातेवाईक मित्र सगळ्यांशी संपर्क केला. पण सुदर्शनबाबत कोणालाच काही माहित नव्हतं. शेवटी कुटुंबीय शेताकडे गेले. त्यावेळी विहिरीजवळ मृत सुदर्शनच्या चपला, कपडे आणि सायकल आढळून आली. गावातील काही नागरिकांनी रात्री उशीरा विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विहिरीत गाळ असल्यानं शोध मोहिम थांबवण्यात आली.

हेही वाचा-महिलेनं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन, PM मोदींना लिहिलं अखेरचं पत्र

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी सुदर्शनचा मृतदेह बाहेर काढला. सुदर्शन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली गेली. पारवा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: 10th class, Death, Student, Yavatmal