Home /News /maharashtra /

रुग्णांसाठी वरदान ठरलेली 108 रुग्णवाहिका पडली आजारी, पालघरमधील धक्कादायक चित्र

रुग्णांसाठी वरदान ठरलेली 108 रुग्णवाहिका पडली आजारी, पालघरमधील धक्कादायक चित्र

अनेकांचे प्राण तसेच वेळेवर उपचार मिळवून देणारी हीच ती 108 नंबरची रुग्णवाहिकाच सद्यस्थितीला आजारी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पालघर, 08 नोव्हेंबर :  108 या क्रमांकावर कॉल केला असता तातडीने प्राथमिक उपचार होत असल्याने या रुग्णवाहिका जखमी व गर्भवती महिलांसाठी वरदान ठरल्या होत्या. पण, सद्यस्थितीला या सेवेसाठीच्या 108 क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्ण वेळेवर पोहचेल का? तसंच त्या रुग्णाला जीवदान मिळेल का ? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केले जात आहेत. कारण, अनेक गरजू लोकांना मदत करणारी ही रुग्णवाहिकाच सध्याला आजारी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पालघरमधील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गंभीर आजारी व्यक्ती तसंच गर्भवती महिलांना  रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आठवण होते ती 108 क्रमांकावर उपलब्ध असलेल्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेची. त्यानुसार गंभीर आजारी किंवा  अपघातात जखमी  व्यक्ती तसंच गर्भवती महिलांना 108 क्रमांकावर कॉल केला असता रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होत होती. थाळ्या-वाद्य वाजवून जल्लोष, जो बायडन यांना PM मोदींनी दिल्या शुभेच्छा म्हणाले... त्यामुळे अनेकांचे प्राण तसेच वेळेवर उपचार मिळवून देणारी  हीच ती 108 नंबरची  रुग्णवाहिकाच सद्यस्थिला आजारी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णवाहिका मधील ऑक्सिजन सिलेंडर हे पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत असून ते नादुरुस्त आहे, अशा अवस्थेत एखादा गंभीर जखमी रुग्णाला किंवा गरोदर मातेला रुग्णलयात उपचारासाठी दाखल करत  असताना ऑक्सिजन अभावी दुर्दैवी मृत्यू झाल्यास जबाबदार कोण ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णवाहिकेतील रुग्णाला घेऊन जाण्यासाठी जे स्ट्रेचर वपरले जाते त्याच्या उजव्या बाजूला टायरच्या वरचा लाकडी भाग निघून गेल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा किंवा रुग्णाचा पाय त्यात जाऊन मोठा अपघात घडू शकतो. गाडीचे टायर हे खराब अवस्थेत असून ते वेळोवेळी पंचर होत आहेत. शिवाय टायर फुटून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका आहे की, मृत्यूचा सापळा असे प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार केली आहे, परंतू, प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण व हलगर्जीपणाचा त्रास मात्र सामान्य रुग्णांना व नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. We did it Joe! कमला हॅरिस यांना आवरले नाहीत अश्रू अध्यक्षांना बातमी कशी दिली? रुग्णवाहिकेला कॉल येताच तात्काळ प्रतिसाद दिला जात होता. रुग्णाची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करून आवश्यकता भासल्यास त्याला पुढील उपचाराकरिता मोठ्या रुग्णालयात पाठवले जात होते . त्यामुळे अनेक रुग्नाचे प्राण देखील वाचले आहेत. परंतु, सद्यस्थितीला मात्र ही रुग्णवाहिकाच आजारी असल्याचे दिसून येत आहे. त्यावर लवकरात लवकर उपचार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Palghar

पुढील बातम्या