मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'कोरोना व्हायरस'चा कहर, 105 वर्षांची परंपरा असलेली सैलानी यात्रा रद्द

'कोरोना व्हायरस'चा कहर, 105 वर्षांची परंपरा असलेली सैलानी यात्रा रद्द

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आता भारतात आला आहे. आतापर्यंत 'कोरोना'नं हजारो बळी घेतले आहेत.

बुलडाणा,5 मार्च:चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आता भारतात आला आहे. आतापर्यंत 'कोरोना'नं हजारो बळी घेतले आहेत. भारतातही काही संशयित रुग्ण आढळले असल्याने महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात आहे. सरकारी व खासगी अशा दोन्ही पातळ्यांवर 'कोरोना'चा सामना करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील 105 वर्षांची परंपरा असलेली सैलानी यात्रा रद्द करण्यात आली आहे. शासनाचा खबरदारी ठेवत मोठा निर्णय घेतला आहे. यात्रे दरम्यान काढण्यात येणारी संदल आणि होळीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा..Coronavirus : तपासणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरात हजारो लोक एकत्र येणारे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने लाखो भाविक येणार असलेल्या सैलानी यात्रा आता रद्द करण्यात आल्याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या बुलडाणा मिटिंग दरम्यान घेण्यात आला आहे. संदल देखील निघणार नसल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा..जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का?

गेल्या 105 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक येत असतात त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरा दिवस या यात्रेसाठी शेकडो अतिरिक्त बसेस सोडण्यात येतात. त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. खऱ्या अर्थाने होळीपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी आतापासून आलेल्या भाविकांना देखील सैलानीवरून बाहेर काढण्यात येणार आहे.

हेही वाचा.. Coronavirus चा कहर! सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद, सरकारचा निर्णय

पिंपळगाव सराई येथून गावातून दर्गापर्यंत निघणार बाबांचा संदल देखील रद्द करण्यात आली असून या ठिकाणी होणारी चौदा ट्रक नारळाची होळी देखील रद्द करण्यात आली असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी गुरुवारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला पं.स. सदस्य तथा मुजावर शेख चांद शेख हबीब आणि सरपंच प्रदीप गायकवाड उपस्थित होते.

First published:

Tags: Flipkart, Maharashtra news, Sachin bansal