Home /News /maharashtra /

100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना मोठा दिलासा? CBI कडून क्लिनचिट?

100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना मोठा दिलासा? CBI कडून क्लिनचिट?

Anil Deshmukh Clean Chit: अनिल देशमुख यांना सीबीआयच्या (CBI) प्राथमिक तपासात क्लीन चिट (Clean Chit) मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 29 ऑगस्ट: 100 कोटी वसुली प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Former Home Minister Anil Deshmukh) आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. दरम्यान आता याच संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयच्या (CBI) प्राथमिक तपासात क्लीन चिट (Clean Chit) मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लोकमतनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप देशमुख यांच्यावर होते. या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याचं समजतंय. सीबीआयच्या 65 पानी प्राथमिक तपासाच्या अहवालाची प्रत सध्या समोर आली आहे. उपअधीक्षक आर.एस. गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशमुख यांच्याविरुद्ध एकही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे आणि म्हणूनच चौकशी बंद करण्यात येत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाली असल्याचं बोललं जात आहे. यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातलं वाहन धडकलं ट्रकला, कारचा चक्काचूर सीबीआयच्या अहवालात म्हटलं आहे की, आतापर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. या प्राथमिक चौकशीअंती त्यांच्याविरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. या चौकशीदरम्यान त्यांच्या विरोधात आरोप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात सुरु असलेली चौकशी थांबवण्यात यावी. तसंच पुढची कारवाई देखील थांबवावी. सीबीआयनं उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर चौकशी सुरु केली होती. नेमकं प्रकरण काय? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी गंभीर आरोप केले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते. असा आरोप केला होता. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि 100 कोटी जमा करण्यास सांगितलं होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Anil deshmukh, CBI, Nagpur

    पुढील बातम्या