फोंडा, 09 जून: वाडीवाडा कुंडई याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या भावाची डोक्यात सळई घालून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी भावाने दहा वर्षांपूर्वी आपल्या मोठ्या भावाचीही हत्या केली होती. यानंतर त्याने आता आपल्या धाकट्या भावाचा काटा काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. किरकोळ कारणांतून दोन्ही सख्ख्या भावांची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित मृत भावाचं नाव प्रभाकर नाईक (48) असून आरोपी सख्ख्या भावाचं नाव सागर नाईक आहे. आरोपी सागरने मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पैशाच्या वादातून धाकटा भाऊ प्रभाकरच्या डोक्यात सळईने वार करून त्याचा खून केला आहे. मंगळवारी रात्री उशीरा आरोपी सागरला पोलिसांनी अटक केली आहे.
पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, 50 वर्षीय आरोपी सागर गुरुदास नाईक याने मंगळवारी रात्री वाडीवाडा-कुंडई येथील रहिवासी असणाऱ्या प्रभाकर गुरुदास नाईक यांच्याशी पैशाच्या कारणावरून भांडण उकरून काढलं. कालांतराने दोन्ही भावंडातील हा वाद वाढत गेला. यातूनचं संताप अनावर झाल्याने आरोपी सागरने प्रभाकर यांच्या डोक्यात सळईने जोरात वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता, की दुसऱ्या क्षणाला प्रभाकर जमीनीवर कोसळले. यानंतर अवघ्या काही मिनीटांतच प्रभाकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर फोंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपी सागरला ताब्यात घेतलं.
हे ही वाचा-दिवसा डब्बेवाला अन् रात्री दरोडेखोर; पुणे पोलिसांनी सराईताच्या आवळल्या मुसक्या
10 वर्षांपूर्वी मोठ्या भावाची हत्या
आरोपी सागरला एकूण दोन भाऊ होते. यामध्ये सागर दुसऱ्या नंबरचा भाऊ होता. 10 वर्षांपूर्वी आरोपी सागरने किरकोळ कारणातून आपल्या मोठ्या भावाची हत्या केली होती. याप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता. अलीकडेचं तो शिक्षा भोगून घरी परतला होता. दरम्यान मंगळवारी त्याने पैशाच्या वादातून आपल्या धाकट्या भावाचीही हत्या केली आहे. या घटनेचा अधिक तपास फोंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder