• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार रुपये आणि 5 हजारांचे धान्य देणार, वडेट्टीवारांची घोषणा

पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार रुपये आणि 5 हजारांचे धान्य देणार, वडेट्टीवारांची घोषणा

'दरवर्षी पूर परिस्थिती येणार असेल तर कायमस्वरूपी काही कुटुंब आणि गाव आणि डोंगराच्या खालील गावांचे पुर्नवसन करण्यात येईल'

  • Share this:
सांगली, 26 जुलै : कोकण (kokan flo0d), सांगली (sangli flood), सातारा आणि कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये खात्यात आणि 5 हजारांची धान्याची मदत केली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली आहे. विजय वडेट्टीवार सांगलीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी, त्यांनी तातडीने मदतीची घोषणा केली. तसंच, नेहमी येणारा महापूर आणि इतर आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा स्तरावर एनडीआरएफच्या धर्तीवर एसडीआरएफ पथके निर्माण करून कायमस्वरूपी तैनात ठेवण्यात येतील, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट 'दरवर्षी पूर परिस्थिती येणार असेल तर कायमस्वरूपी काही कुटुंब आणि गाव आणि डोंगराच्या खालील गावांचे पुर्नवसन करण्यात येईल. त्याचबरोबर, 'सांगली जिल्ह्यात कायमस्वरूपी आपत्ती कमांड कंट्रोल सेंटर लवकरच निर्माण केली जाईल, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगतील. दरम्यान, स्वर्गीय पतंगराव कदम यांनी सांगलीला पूर आल्यावर तातडीची भक्कम अशी मदत केली होती. त्यावेळी राज्याची स्थिती चांगली होती. आता कोरोना आहे, आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. पण नुकताच आम्ही नियम धाब्यावर बसवून चक्रीवादळाला पैसे दिले आहेत, असे वक्तव्य विजय वड्डेटीवार यांनी केले. तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दरम्यान, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. यावेळी तातडीने कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. 'नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पुराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायिकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध जागांसाठी पदभरती; 'या' उमेदवारांसाठी मोठी संधी 'तत्काळ मदत देऊच, पुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यां याबाबत जिल्हा निहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसंच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published: