Home /News /maharashtra /

Water Cut : ठाणेकरांसाठी चिंतेची बातमी! मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 10 टक्के पाणीकपात

Water Cut : ठाणेकरांसाठी चिंतेची बातमी! मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 10 टक्के पाणीकपात

पाणी कपात लागू असताना अतिरिक्त जलजोडणी अथवा वाढीव जलजोडणीच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

    ठाणे, 27 जून : मुंबई महानगरपालिकेकडून पाणी कपातीचा (Water cut by bmc) निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लगेचच ठाणे महानगरपालिकेसुद्धा (TMC) याच संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगपालिकेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. (Water Cut in Thane) या पत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे. काय आहे आदेशात - मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस प़डला आहे. त्यामुळे सध्यच्या परिस्थितीत तलावांमध्ये अत्ंयत कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही 10 टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे. त्यामळे मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महानगरपालिकेस होत असलेल्या पाणी पुरवठ्यात आज 27 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पाणी कपात लागू असताना अतिरिक्त जलजोडणी अथवा वाढीव जलजोडणीच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. हेही वाचा - महाराष्ट्रातील मोठी बातमी : अजित पवार क्वारंटाईन सध्याची परिस्थिती पाहता, पाणीकपातीची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत व पाण्याची बचत करण्याबाबत विविध उपाययोजनांसंबंधी सूचना देऊन सहकार्य, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे. एका अहवालानुसार, जून महिन्यातील पाऊस मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 70 टक्के कमी आहे, असे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) अंतर्गत येणाऱ्या भागात आजपासून पाणीपुरवठ्यात (Mumbai water supply) 25 टक्के कपात होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Drink water, Thane, Water crisis

    पुढील बातम्या