औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी, रुग्ण संख्या 291 वर

औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी, रुग्ण संख्या 291 वर

आज औरंगाबादेत सकाळी आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 04 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक पाठोपाठ औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात कोरोनाचा 10 वा बळी घेतला आहे.

औरंगाबाद शहरात आज सकाळी 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 291 वर पोहोचली आहे. शहरात 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र, मार्च महिन्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, अचानक एप्रिल महिन्यात मध्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली.

औरंगाबाद महापालिका प्रशासनाच्या वतीने  बाधित झालेल्या भागांमध्ये दारोदार तपासणी सुरू केल्याने रोज नव्या रुग्णांची आकडेवारी समोर आली. तसंच शहरात हॉटस्पॉटही वाढत गेले.

हेही वाचा -कोरोना योध्यांना सलाम! मुलची मृत्यूशी झुंज, पोलीस जवान मात्र कर्तव्यावर हजर

शहरात 27 एप्रिल रोजी सर्वाधिक 42 रुग्ण आढळले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 28 तारखेला 24 रुग्ण, 29 तारखेला 10 आणि 30 तारखेला 22 रुग्ण आढळले. तर 1 मे रोजी सकाळी 7 आणि संध्याकाळी 32 रुग्ण आढळले. तर 2 मे रोजी 23 रुग्ण आढळले होते. तर 3 मे रोजी आणखी 38 रुग्णांची भर पडली.

आज औरंगाबादेत सकाळी आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  पुंडलीकनगरच्या माध्यमातून एका नव्या हॉटस्पॉटची शहरात भर पडली आहे. आज सकाळी सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये  नंदनवन कॉलनी 1, देवळाई 1, पुंडलिकनगर 2,  भीमनगर 3, किलेअर्क 1, सावित्री नगर आणि चिकलठाणा 1 अशी रुग्ण संख्या आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 4, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या