गोवा सरकारमध्ये होणार मोठे बदल, यांची लॉटरी तर यांना मिळणार डच्चू

गोवा सरकारमध्ये होणार मोठे बदल, यांची लॉटरी तर यांना मिळणार डच्चू

गोव्यातल्या डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. गोव्यात स्वतंत्र गट करून भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 काँग्रेस आमदारांपैकी 4 आमदारांना मंत्रिपदे मिळू शकतात.

  • Share this:

पणजी, 11 जुलै- गोव्यातल्या डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. गोव्यात स्वतंत्र गट करून भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 काँग्रेस आमदारांपैकी 4 आमदारांना मंत्रिपदे मिळू शकतात. दुसरीकडे, विद्यमान पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असलायची माहिती मिळाली आहे. उद्या (12 जुलै) सकाळी राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे.

काँग्रेसच्या गोटात देशभर खळबळ सुरु असताना गोव्यात बुधवारी रात्री कॉंग्रेसचे 15 पैकी 10 आमदारानी स्वतंत्र गट करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बंडखोर आमदारांनी घेऊन आज (गुरुवारी) पक्षाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. या राजकीय घडामोडीमुळे काठावरच बहुमत असणाऱ्या भाजपाच्या आमदारांची संख्या 17 वरून 27 झाली आहे. त्यामुळे भाजपला आता पाठींबा देणाऱ्या घटक पक्ष आणि अपक्षांची गरज उरली नाही. दुसरीकडे नव्याने भाजपात दाखल झालेल्या आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागणार आहे. यासाठी गोव्यातल्या डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मोठे बदल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी राजभवनवर हा शपथविधी सोहळा पार पडेल.

यांना मिळू शकते मंत्रिपद..

-बाबू कवळेकर (उपमुख्यमंत्री)

-बाबूश मोन्सेरात

-फिलिप नेरी रॉड्रिगीज

-नीलकंठ  हर्ळनकर

-सुभाष शिरोडकर

वरील सर्व बंडखोर काँग्रेस आमदार आहेत, तर याशिवाय या आमदारांना फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनाही मंत्रिपद देण्यात येईल.

यांची मंत्रिपदे धोक्यात...

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे यांची मंत्रिपदे धोक्यात आहेत. याशिवाय दुसरे अपक्ष आमदार आणि कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे किंवा भाजपचे मंत्री मिलिंद नाईक यांच्या पैकी एकाचे मंत्रिपद काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धोनी बाद झाला अन् चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO व्हायरल

First published: July 11, 2019, 9:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading