Home /News /maharashtra /

डोंबिवलीला धुरात लोटणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, एका कारखान्याला तब्बल 1 कोटीचा दंड!

डोंबिवलीला धुरात लोटणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, एका कारखान्याला तब्बल 1 कोटीचा दंड!

डोंबिवली औद्योगिक विभागातील सुमारे 40 ते 45 कंपन्याना 25 लाख रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली

डोंबिवली, 25 फेब्रुवारी : डोंबिवलीत एमआयडीसी मधील कंपन्यावर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने पर्यावरणाची हानी केल्याचा ठपका ठेवला आहे. त्याच कारणाकरिता एमपीसीबीने डोंबिवली औद्योगिक विभागातील सुमारे 40 ते 45 कंपन्याना 25 लाख रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली असून त्यातील एका कंपनीला चक्क 1 कोटी नोटीस बजावली आहे. 25 लाख दंड भरण्याची नोटीसची प्रत न्यूज 18लोकमतला सूत्रांनी दिली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका असून त्यांची सखोल चौकशी करा अशी मागणी केली आहे. डोंबिवलीचा प्रदूषणाचा प्रश्न गाजत असताना उद्योजक आपल्या कारखान्यात आणि परिसरात योग्य प्रकारे पर्यावरणाचे रक्षण करत नाही. यामुळे पर्यावरणाची हानी झाल्याचा ठपका ट्रिब्युनलने ठेवला आहे आणि एमपीसीबीने 25 लाखाचा दंड आकारत येत्या काही दिवसात भरण्याची नोटीस बजावली आहे. डोंबिवलीतील काही रासायनिक कंपन्या अत्यंत निष्काळजीपणा करत असून त्यांच्या मुळे हा दंड होत असल्याचे सांगण्यात आलं. याबाबत उद्योजकांच्या कामा संघटनेनं काहीतरी मध्यम मार्ग काढा जेणेकरून कंपनी चालल्या पाहिजेत आणि त्यांनी सुधारले सुद्धा पाहिजे. तर याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका असून त्यांची सखोल चौकशी केली पाहिले, असं सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या