मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सरकारी अधिकार्‍यांना 'आयपॅड'

सरकारी अधिकार्‍यांना 'आयपॅड'

    2 डिसेंबर : सरकारी कार्यालय म्हटलं की फायलींचा ढीग समोर येतो. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसकर यांनी मात्र चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा चेहरा हायटेक केलंय. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि 15 तहसिलदार यांच्यासह तब्बल 32 अधिकार्‍यांना आयपॅड उपलब्ध करुन दिले आहेत.

    या अधिकार्‍यांना आयपॅड वापरण्याच प्रशिक्षणही देण्यात आले असुन यामुळे अधिकार्‍यांकडे फाईलींचा वापर कमी प्रमाणात होतो.तसच यामुळे आवश्यक असलेली माहिती तात्काळ उपलब्ध होतेय. अधिकारी बैठकीला येताना फाईल ऐवजी आयपॅड घेऊन येत आहेत. आयपॅडमध्ये इंटरनेट ई-मेल सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

    फाईल शोधण्याचा वेळ वाचतोय तर दुसरीकडे दुर्घटनेत आग लागुन फाईल जळाल्यानंतर जो त्रास आहे. तो त्रास सगळी माहिती आयपॅडमध्ये सुरक्षित असल्यान वाचणार आहे.शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सगळ्या विभागाच संगणकीकरण केल्यान फाईलीचा पसारा कमी झालाय. सेतू केंद्रातल्या निधीतून दीडकोटी रुपये खर्चुन या आयपॅडची खरेदी झाली आहे.

    First published:

    Tags: Government, Ipad, Officials, Smartphone, Tab