Home /News /maharashtra /

विद्यार्थ्यांच्या कल्पना जगाला दिशादर्शक -रतन टाटा

विद्यार्थ्यांच्या कल्पना जगाला दिशादर्शक -रतन टाटा

11 नोव्हेंबर : विद्यार्थ्यांचा मुल्याधिष्ठीत दृष्टीकोण हा भारताला सर्वोच्च स्थानावर नेऊ शकेल,असा विश्वास उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केलाय. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या राजाराम बापू इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एन जे पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी 270 विद्यार्थ्यांना एम-टेक आणि एमबीए च्या पदव्या देण्यात आल्यात. देशातल्या शिक्षित तरूणांनी नम्रता आणि अभ्यासुवृत्ती जपत स्वत:बरोबर देशाच्या भवितल्याचा विचार करावा असं सांगून रतन टाटा पुढं म्हणाले की, तुमच्या कल्पना या जगाला दिशा देऊ शकतात. कारण काही तरूणांच्या कल्पनाशक्तीतून मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक यांसारख्या कंपन्या उदयाला आल्या. म्हणूनच सुरक्षित जगतातून बाहेर पडून तरूणांनी निरंतर शिक्षण आत्मसात केलं पाहिजे. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, भगत पाटील प्राचार्य एस.एस.कुलकर्णी उपस्थित होते.

First published:

Tags: Ratan tata, रतन टाटा

पुढील बातम्या