22 ऑगस्ट : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात अखेर मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याने पुणे मेट्रो आता राजकारणाच्या यार्डातून निघून रूळावर येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या 10 वर्षापासून प्रकल्पाची चर्चा सुरू आहे.
मेट्रो भूमिगत का एलिवेटेड यावर मतभेद तर कधी 4 एफएसआयचा वाद असा वादविवादात मेट्रो अडकली होती. त्यातच पुण्याआधी नागपूर मेट्रोला हिरवा कंदील मिळाल्यानं श्रेयवादाचं-कुरघोडीचं राजकारण रंगलं होतं. आता केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील बैठकीनंतर पुणे मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय झाला.
असा होता पुणे मेट्रोचा प्रवास
- जानेवारी 2010 मध्ये पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता
- फेब्रुवारी 2012 मध्ये राज्य सरकारची तत्त्वत: मान्यता
- 20 ऑगस्ट 2014ला 10 हजार 869 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा सादर
- मेट्रोचं काम पुणे पालिकेकडून डीएमआरसीकडे सोपवण्यात आलं
- वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे 31 किलोमीटरचे 2 मार्ग
- गेल्या 4 वर्षांत प्रकल्पाचा खर्च अडीच हजार कोटींनी वाढला
- गेल्या 6 महिन्यांतच अटींच्या पूर्ततेसाठी 700 कोटींनी खर्च वाढला
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.