Home /News /love-story /

20 वर्षीय प्रियकरासोबत फरार झाली 4 मुलांची आई, पतीनं गाठलं पोलीस ठाणं, वाचा पुढे काय घडलं

20 वर्षीय प्रियकरासोबत फरार झाली 4 मुलांची आई, पतीनं गाठलं पोलीस ठाणं, वाचा पुढे काय घडलं

दोघांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून वैनगंगा नदीत उडी घेतली होती, त्यामुळे हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत.

दोघांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून वैनगंगा नदीत उडी घेतली होती, त्यामुळे हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत.

स्वतःपेक्षा अर्ध्या वयाच्या आपल्याच भागात राहाणाऱ्या या तरुणासोबत महिलेचे संबंध (Extra Marital Affair) होते. यानंतर चार मुलांची आई असलेल्या या महिलेनं आपल्या प्रियकरासोबत पळ काढला.

    नवी दिल्ली 09 मार्च : प्रेम माणसाला काहीही करण्यास भाग पाडू शकतं याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. 40 वर्षीय महिलेचं एका 20 वर्षीय तरुणावर प्रेम (Extra Marital Affair) जडलं. स्वतःपेक्षा अर्ध्या वयाच्या आपल्याच भागात राहाणाऱ्या या तरुणासोबत महिलेचे संबंध होते. यानंतर चार मुलांची आई असलेल्या या महिलेनं आपल्या प्रियकरासोबत पळ काढला. मात्र, आता या प्रकरणात न्याय मागण्यासाठी महिलेच्या पतीनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना उत्तराखंडच्या रूडकीमधील आहे. सुरुवातीला काही दिवस या संबंधांबद्दल कोणालाही भनक नव्हती. पण ही गोष्ट फार काळ लपून राहू शकली नाही. हे प्रकरण उघड होतात दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघं पळून गेले खरे पण यानंतर पती आपल्या चार मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला तेव्हा ती उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये असल्याचं समोर आलं. यानंतर महिलेला पोलिसांनी परत आणलं मात्र तिचा 20 वर्षीय प्रियकर अजूनही फरार आहे. महिला आता परत आली असली तरीही ती कायमची आपल्या पती आणि मुलांसोबत राहाण्यासाठी आलेली नाही. नातेवाईकांनी खूप समजावल्यानंतरही महिलेनं पतीसोबत आणि आपल्या मुलांसोबत राहाण्यास नकार दिला आहे. आपल्याला आपल्या प्रियकरासोबतचत राहायचं असल्याचं ही महिला वारंवार सांगत आहे. त्यामुळे, पोलिसांनीही हे प्रकरण घरीच चर्चा करुन सोडवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, महिला आपल्या मतावर ठाम असल्यानं पतीला याबाबतीत दिलासा मिळणार नसल्याचं चित्र आहे. 20 दिवसांनंतर महिलेला शोधण्यात यश आलं असलं तरी महिलेनं पतीसोबत राहाण्यास नकार दिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Women extramarital affair

    पुढील बातम्या