एकनाथ खडसेंनीही केला मुख्यमंत्रीपदावर दावा

एकनाथ खडसेंनीही केला मुख्यमंत्रीपदावर दावा

  • Share this:

eknath khadse_for cm20 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीची घोषणा आता आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय तर महायुतीत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरुन वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे. भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदासाठी आणखी एक दावेदारी पुढे आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलाय.

भाजपमध्ये आपल्याला 35 वर्ष झालीय. आणीबाणीच्या काळात सरपंच म्हणून मी निवडून आलो त्यानंतर अनेक पायर्‍या चढत आज आमदार झालो. त्यामुळे प्रशासन, शासनाच्या कामाचा अनुभव जवळून आलाय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा ठेवण्यात गैर काय असं खडसेंनी स्पष्टपणे सांगितलंय.

भाजपमध्ये ज्याचं नाव चर्चेत नसतं त्याचं नाव अचानक समोर येतं हा इतिहास आहे, असा सुचक इशारा पक्षातील नेत्यांना दिला. प्रशासनाचा सर्वाधिक अनुभव हा इतरांपेक्षा माझ्याकडे सर्वाधिक असल्याचं खडसेंनी सांगितलंय. तीन वेळा प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे चालून आलं पण यावेळी आपण नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांना संधी दिलीय, याचीही आठवण खडसेंनी यावेळी करुन दिली.

Follow @ibnlokmattv

First published: August 20, 2014, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading