अशोक चव्हाण यांच्या पत्नी विधानसभेच्या रिंगणात ?

अशोक चव्हाण यांच्या पत्नी विधानसभेच्या रिंगणात ?

  • Share this:

ameeta chavan20 ऑगस्ट : नांदेडमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून एक लाख मताधिक्यानं निवडून आले होते. आता चव्हाण लोकसभेवर गेल्याने भोकरमधून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे.

अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी नांदेडमधील काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई येथे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखातीदरम्यान भोकर विधानसभेसाठी एकही अर्ज आला नाही, किंवा एकानेही उमेदवारी मागितली नाहीये.

भोकर या मतदार संघाबाबत अशोक चव्हाण जे ठरवतील तोच उमेदवार राहील अशी कार्यकर्त्याची भूमिका आहे. त्यामुळे भोकरमधून अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 20, 2014, 6:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading