राणेंचा पलटवार, पराभव राष्ट्रवादीमुळेच !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 23, 2014 09:43 PM IST

राणेंचा पलटवार, पराभव राष्ट्रवादीमुळेच !

00rane_vs_pawar23 मे : लोकसभा निवडणुकीत पराभवाला जबाबदार कोण ? यावरुन आघाडीत जुंपली आहे. राष्ट्रवादीने पराभवाचं खापरं काँग्रेसवर फोडलंय तर काँग्रेसने राष्ट्रवादीला जबाबदार धरलंय. आघाडीच्या पराभवाला राष्ट्रवादीच जबाबदार आहे असा पलटवार काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला. तसंच ज्या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले ते पडले. यामागे षड्‌यंत्र असू शकत असा आरोपही राणे यांनी केला.

लोकसभेत पराभवाचं खापर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंतन बैठकीत काँग्रेसवर फोडलं. आता विधानसभा निवडणुकीत राज्यातली परिस्थिती कठीण असली तरी हाताबाहेर गेली नाही. त्यासाठी आत्मविश्वासानं कामाला लागावं लागेल, अशा सूचना पवारांनी दिल्या.

पण त्याचवेळी आता राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार जास्त असल्याने विधानसभेच्या जागावाटपाचं सूत्र नव्यानं ठरवायला हवं, असंही पवार म्हणाले. आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागांवर दावा सांगितला जाईल, याचे संकेत दिले. तर प्रफुल्ल पटेल यांनीही काँग्रेलाच जबाबदार धरलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2014 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...