नाशिकमध्येही मनसेचं 'इंजिन' घसरलं, मतांचा 'डब्बा' खाली !

नाशिकमध्येही मनसेचं 'इंजिन' घसरलं, मतांचा 'डब्बा' खाली !

  • Share this:

00raj_thakarey

21 मे : लोकसभा निवडणुकीत मतदारांनीच मनसेला 'औकात' दाखवली त्यामुळे मनसेला मोठा हादरा बसलाय. तर दुसरीकडे मनसेची नाशिकमध्ये सत्ता आहे पण तिथेही इंजिन घसरलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून मनसेचे तब्बल 3 आमदार निवडून आले होते. त्याच मताधिक्याच्या जोरावर मनसेनं नाशिक महापालिकेत सत्ताही काबीज केली. पण, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधली मनसेची मतं कमालीची कमी झाली आहे.

 

विशेष म्हणजे मनसेच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही मनसेच्या उमेदवाराची अवस्था अत्यंत केवीलवाणी झाली होती. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार ऍड. उत्तम ढिकले यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 47 हजार मतं मिळाली होती. पण आता लोकसभा निवडणुकीत फक्त 9 हजार मतं मिळाली. तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आ. नितीन भोसले यांना 2009 च्या विधानसभेच्या वेळी 62 हजार मतं मिळाली तर लोकसभेत 10 हजार मतं मिळाली.

 

Loading...

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार वसंत गीते यांना 2009 विधानसभेच्या निवडणुकीत 52 हजार मतं मिळाली होती आणि आता लोकसभा निवडणुकीत 11 हजार मतं मिळाली. एवढंच नाही डॉ.प्रदीप पवार मनसेचे उमेदवारही पराभूत झाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धोक्याची घंटा वाजली आहे.

नाशिकमध्ये मनसेचा घसरता आलेख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ

  • - आमदार ऍड. उत्तम ढिकले
  • - विधानसभा 2009 - 47 हजार मतं
  • - लोकसभा 2014 - 9 हजार मतं

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ

  • - आमदार नितीन भोसले
  • - विधानसभा 2009 - 62 हजार मतं
  • - लोकसभा 2014 - 10 हजार मतं

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ

  • - आमदार वसंत गीते
  • - विधानसभा 2009 - 52 हजार मतं
  • - लोकसभा 2014 - 11 हजार मतं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2014 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...