अंतर्गत वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यात गमावल्या 10 जागा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 21, 2014 04:59 PM IST

अंतर्गत वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यात गमावल्या 10 जागा

congress NCP 21 मे :  राज्यात मोदी लाटेनं काँग्रेस राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला असं चित्र निर्माण झाल आहे. पण खर्‍या अर्थाने काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षातल्या अंतर्गत वादामुळे आघाडीने तब्बल 10 जागा गमावल्यात. अंतर्गत वादावर पडदा पडून मतविभागणी टाळता आली असती तर काँग्रेसला सात आणि राष्ट्रवादीला तीन जागा अधिक मिळाल्या असत्या असं चित्र आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे.

अकोला लोकसभेसाठी काँग्रेसने भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी उमेदवारी बाबत चर्चा केली होती. पण ही चर्चा फिस्कटल्याने काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. हा वाद मिटवण्यात काँग्रेसला यश आलं असते आणि प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार झाले असते तर भाजप आणि काँग्रेसची मतविभागणी टळू शकली असती. ती काँग्रेससाठी फायदेशीर ठरली असती.

अकोला लोकसभा मतदारसंघ

 • भाजपा - संजय धोत्रे 4 लाख 55
 • Loading...

 • काँग्रेस - हिदायत पटेल 2 लाख 53 हजार
 • भारिप - प्रकाश आंबेडकर - 2 लाख 38 हजार
 •  एकत्रित बेरीज केली तर 4 लाख 90 हजार मतं होतात

अमरावती लोकसभा मतदार संघात राजेंेद्र गवई राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार होते पण अचानक नवनित कौर यांच नाव पुढे आलं. त्यात गुणवंत देवपारेंची भर पडली. ही गणित पाहिली आणि निवडणुकीत राष्ट्रवादीत वाद झाले नसते तर मतविभागणी टळली असती त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असता.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

 • शिवसेना - आनंदराव अडसूळ 4 लाख 65 हजार
 • राष्ट्रवादी - नवनीत राणा - 3 लाख 29 हजार
 • अपक्ष - गुणवंत देवपारे - 98 हजार
 • रिपाई - राजेंद्र गवई - 54 हजार मतांची
 • तिघांची एकत्र बेरीज - 4 लाख 80 हजार

चंद्रपुर लोकसभा मतदार संघात तिकीट वाटपात प्रचंड चुरस होती. काँग्रेसने माजी खासदार नरेश पुंगलीया यांच्या एवजी मंत्री संजय देवतळे यांना तिकिट दिल. त्यात काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी झाली. त्यात वामनराव चटप यांनी 'आप'चा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. ही मतविभागणी झाली नसती तर काँग्रेसला ही जागा राखता आली असती.

चंद्रपुर लोकसभा मतदारसंघ

 • भाजपा - हंसराज अहिर - 5 लाख आठ हजार
 • आप - वामनराव चटप - 2 लाख 8 हजार
 • काँग्रेस - संजय देवतळे - 2 लाख 72 हजार
 • कुंभारे हंसराज गुलाब - 50 हजार मत

आप, काँग्रेसची मतं विभागणी झाली नसती तर काँग्रेसला ही जागा जिंकण्याची संधी होती.

माावळ लोकसभा क्षेत्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत बंडखोरी शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे. राष्ट्रवादी समर्थक आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीनं ऐनवेळी राहूल नार्वेकरांना उमेदवारी दिली. या दोघांची मतविभागणी झाली नसती तर याठिकाणी राष्ट्रवादीला जागा गमवावी लागली नसती.

माावळ लोकसभा मतदारसंघ

 • शिवसेना - श्रीरंग बारणे - 5 लाख 12 हजार
 • शेकाप - लक्ष्मण जगताप - 3 लाख 54 हजार
 • राष्ट्रवादी - राहूल नार्वेकर - 1 लाख 82 हजार
 • शेकाप & राष्ट्रवादीची एकूण बेरीज - पाच लाख 30 हजार

तर भिवंडी, पालघर काँग्रेस अंतर्गत झालेल्या वादामुळे या दोन्ही मतदार संघात काँग्रेस अंतर्गत बंडाळीचा फटका काँग्रेसला बसलाय. तर नंदूरबार , सांगली , रायगड , रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्हयात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या टोकाच्या वादानं आघाडीला सहा जागा गमवाव्या लागल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2014 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...