...छगन भुजबळ बेपत्ता !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2014 10:31 PM IST

...छगन भुजबळ बेपत्ता !

67bhujbal19 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं. राष्ट्रवादीला फक्त चारच जागा पदरात पडल्यात तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पराभूत झाले. निसटता पराभव झालेले जलसंपदा मंत्री सुनील तटकरे निकालाच्या तीन दिवसांनंतर हसतमुखाने जनतेसमोर आले. मात्र लाजीरवाणा पराभव झालेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अद्याप नाशिकमध्ये परतले नाहीत.

मेडा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आजपासून नाशिकमध्ये सुरू झालाय. तटकरे आणि भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. याला तटकरेंनी हजेरी लावली मात्र भुजबळ फिरकलेही नाहीत. आपल्यावरच्या गैरव्यवहारांमुळे पराभव झाल्याचा मुद्दा तटकरेंनी खोडून काढला. विरोधकांची इच्छा असेल तर राजीनामा निश्चित देऊ असंही ते म्हणाले आणि पुन्हा आत्मविश्वासानं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी 1 लाख 85 हजार मतांनी भुजबळांचा पराभव केला. हेमंत गोडसे यांनी बाजी मारत 4,94,735 मत मिळवत विजय मिळवला तर भुजबळ यांना 3,07,399 इतकीच मत मिळाली. पराभवाचा धक्का बसल्यामुळे भुजबळ यांची प्रकृतीही खालावलीय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2014 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...