मनसेचा सुपडा साफ, सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 17, 2014 05:41 PM IST

मनसेचा सुपडा साफ, सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

98raj_thakarey_417 मे : 'मनसेची औकात दाखवून देईन' अशी गर्जना करुन लोकसभा निवडणुकीत उतरलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तोंडघशी पडले. नरेंद्र मोदींच्या त्सुनामीमुळे मनसेचं इंजिन घसरलंय. मनसेच्या सर्वच्या सर्व म्हणजे दहा लोकसभा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. त्याचबरोबर मनसेला मिळणार्‍या मतांचा टक्काही घसरला आहे. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला आहे.

मनसे लोकसभा लढवणार की नाही यावरुन सस्पेन्स निर्माण झाला होता पण राज यांनी वेगळी खेळी खेळत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करत लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. आमचे उमेदवार निवडून आले तर नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी भूमिकाच राज यांनी मांडली होती. ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहे त्याच ठिकाणी मनसेनं आपले उमेदवार उतरवले पण एकाही जागी मनसेचा उमेदवार निवडून आला नाही.

एवढंच नाही तर प्रचार सभेत 'चिकन सूप, बडाडेवडे', 'परप्रांतीयांना परत मारीन' असं राजकारणही राज यांनी केलं. मनसेचे बडे नेते बाळा नांदगावकर यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईतील सर्वच जागांवर मनसेचे उमेदवार पडले. त्यापाठोपाठ पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे इथले उमेदवारही मोठ्या संख्याने पराभूत झाले. त्यामुळे आता विधानसभेच्या आखाड्यात मनसेला ताकही फूकुन प्यावे लागणार अशीच परिस्थिती निर्माण झालीय.

Loading...

मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली

दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर - 84,773 मतं मिळाली, इथं सेनेचे अरविंद सावंत 3,74,609 मतांनी विजयी

दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर - 73,113 मतं मिळाली, इथं सेनेचे राहुल शेवाळे 3,81,275 मतांनी विजयी

उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर - 66,088 मतं मिळाली, इथं सेनेचे गजानन किर्तीकर 4,64,820 मतांनी विजयी

कल्याण - राजीव पाटील - 1,22,349 मतं मिळाली, इथं सेनेचे डॉ.श्रीकांत शिंदे 4,40,892 मतांनी विजयी

शिरूर - अशोक खंडेभराड - 3,64,48 मतं मिळाली, इथं सेनेचे शिवाजी आढळराव पाटील 6,43,415 मतांनी विजयी

पुणे - दीपक पायगडे - 93,502 मतं मिळाली, इथं सेनेचे अनिल शिरोळे 6,43,415 मतांनी विजयी

नाशिक - डॉ.प्रदीप पवार - 63,050 मतं मिळाली,इथं महायुतीचे हेमंत गोडसे 4,94,735 मतांनी विजयी

कसं होतं डिपॉझिट जप्त ?

डिपॉझिट वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश म्हणजे 16.6 टक्के मतं आवश्यक होती. पण मनसे आणि आपच्या उमेदवारांना तेवढीही मतं मिळु शकलेली नाहित. सर्वसाधारण/ ओबीसी उमेदवारांसाठी पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम होती. तर एस.सी / एस .टी उमेदवारांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2014 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...