राजेंनी गड राखला म्हणाले, इथं फक्त 'राजे फॅक्टर' !

राजेंनी गड राखला म्हणाले, इथं फक्त 'राजे फॅक्टर' !

  • Share this:

67bhosle416 मे : छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले यांनी आपला गड कायम राखलाय. सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले हे तब्बल 5 लाख 22 हजार 531 मतांनी निवडून आले आहेत. या विजयानंतर सातार्‍यात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

विजयानंतर उदयनराजेंनी आपल्या अनोख्या स्टाईलने ओमनी मधून निकालाच्या ठिकाणी एंट्री केली. कॉलर ताठ करुन निकाल केंद्रात जाऊन राजेंनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून पत्र घेतले आणि या नंतर पत्रकारांशी बोलताना सातार्‍यात मोदी फॅक्टर नाही आणि कुठलाच फॅक्टर नाही फक्त उदयनराजे फॅक्टरच चालतो आणि या पुढेही चालणार असा विश्वास व्यक्त केला.

तर ,मी इथे माझे सर्टीफिकेट घेण्यासाठी आलो नाही तर माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचे जप्त झालेले डिपॉझिटचे पैसे घेण्यासाठी आलोय असा मिश्किल टोलाही उदयराजे भोसले यांनी लगावला.

First published: May 16, 2014, 5:09 PM IST

ताज्या बातम्या