राष्ट्रवादीला धक्के पे धक्का;भुजबळ, तटकरे आणि पटेल पराभूत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 05:47 PM IST

राष्ट्रवादीला धक्के पे धक्का;भुजबळ, तटकरे आणि पटेल पराभूत

770bhujbal_tatkare_patel

16 मे : देशभरात काँग्रेसविरोधी लाट आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीमुळे काँग्रेस पुरता भुईसपाट झालीय. राज्यातही  आघाडी सरकारला धक्के पे धक्का बसलाय. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर त्यांच्या पाठोपाठ वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचाही पराभव झाला.

नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी 1 लाख 85 हजार मतांनी भुजबळांचा पराभव केला आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फैरीपासून भुजबळ पिछाडीवर होते. हेमंत गोडसे यांनी बाजी मारत 4,94,735 मत मिळवत विजय मिळवला. तर भुजबळ यांना 3,07,399 इतकीच मत मिळाली. नाशिकमध्ये भुजबळ यांचा विजय निश्चित मानला जात होता पण अचानक झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादीला चांगलाच हादरा बसला.

Loading...

मात्र उमेदवारीच्या वेळी भुजबळ यांनी निवडणूक लढवण्यास नाही असा सूर लगावला होता. एवढेच नाही तर भुजबळ यांच्या समर्थकांनीही भुजबळांना दिल्लीला पाठवू नका यासाठी आंदोलनंही केलं होतं. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेला चांगला फटका बसलाय. मनसेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार तिसर्‍या नंबरवर फेकले गेले. प्रदीप पवार यांना 63050 मत मिळाली.

तर भंडारा - गोंदिया मतदारसंघात भाजपचे उमेदवार नाना पटोले 1,49,000 मतांनी विजयी झाले. पटोले यांनी राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. या निकालाची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. तर रायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गीते यांचा निसटता विजय झालाय. गीते 2110 मतांनी विजयी झाले. त्यांनी सुनील तटकरेंचा पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...