उमेदवारांची 'दिल्ली'वारी महिलांच्या हाती !

 • Share this:

A woman shows her ink-marked finger after voting inside a polling station in the village of Kamshet, in the western Indian state of Maharashtra29 एप्रिल : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडलं. पण यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना दिल्ली मात्र दूरच राहिली. पण महिलांनी सर्वाधिक मतदान करून उमेदवारांसाठी दिल्लीची वाट ठरवून दिलीय.

 

राज्यात 48 जागांपैकी 18 जागांवर खासदार कोण असेल याचा निर्णय महिलांनी घेतलाय. या अठरा मतदार संघात महिलांनी 60 टक्क्यांपासून तर 71 टक्यांपर्यंत मतदान केलंय. नुकत्याच चार राज्यांच्या निवडणुकीत महिलांची आणि तरुणांची मतं निर्णायक ठरली होती. महाराष्ट्रात हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक 72 टक्के मतदान महिलांनी केलंय.

 

तर नक्षलवाद्यांचा सावटाखाली असलेल्या गडचिरोली चिमूरमध्ये 71 टक्के तर भंडारा आणि गोंदियामध्ये तब्बल 71 टक्के मतदान केलंय. तर नंदूरबारमध्ये 64 मतदान करून महिलांनी आपली ताकद दाखवून दिलीय. त्यापाठोपाठ शाहू महाराजांची नगरी कोल्हापूरमध्ये 71 टक्के मतदान केलंय. त्यापाठोपाठ परभणी, 61, जालना 63, पालघर 62, रायगड 65 आणि बीडमध्ये 66 महिलांनी मतदान केलंय.ही टक्केवारी पाहता महाराष्ट्रातील लोकसभेच्या 18 जागांवर महिलांनी केललं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याविषयी उत्सुकता लागली आहे.

ही आहे  मतदानाची टक्केवारी

 • नंदूरबार - 64 %
 • रावेर - 61 %
 • वर्धा - 61 %
 • गडचिरोली - चिमूर - 71 %
 • भंडारा - गोंदिया - 71 %
 • चंद्रपूर - 60 %
 • हिंगोली - 63 %
 • परभणी - 61 %
 • जालना - 63 %
 • पालघर - 62 %
 • रायगड - 65 %
 • बीड - 66 %
 • उस्मानाबाद - 62 %
 • लातूर - 60 %
 • सांगली - 62 %
 • कोल्हापूर - 71 %
 • हातकणंगले - 72 %

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 09:12 PM IST

ताज्या बातम्या